अजित पवारांनी पुरवला चोपदाराच्या लेकीचा हट्ट; वाचा नेमकं काय घडलं…

राज्याच्या राजकारणात आक्रमक नेत्यांच्या यादीत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव येते. अजित पवारांची काम करण्याची पद्धत ही बाकी नेत्यांपेक्षा वेगळी असल्याने नेहमी त्यांच्या कामाचे कौतुक होते. तसेच कामचुकारपणा करणाऱ्यांवर अजित पवार चांगलेच भडकतात, हेही रूप आपण पाहिले आहे. मात्र काल अजित पवारांचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले. (ajit pawar meet chopdar daughter and son in law wish)

अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या चोपदारांनी एक इच्छा व्यक्त केली आणि क्षणाचाही विलंब न करता अजितदादांनी त्याची इच्छा पूर्ण केली. आज दिवसभर अजित दादांच्या या रुपाचे कौतुक होतं आहे. तर जाणून घेऊ या नेमकं काय घडलं आहे.

अजित पवारांचे चोपदार विलास मोरे यांच्या लेकीची आणि जावयाचा अनेक दिवसांपासूनचा हट्ट अगदी चुटकीसरशी पुरवला गेला. यामुळे विलास मोरे यांनी देखील अजित पवारांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री कार्यालयात विलास मोरे हे चोपदार पदावर कार्यरत आहेत. येत्या काही दिवसात ते सेवानिवृत्त होत आहेत.

त्याचं झालं असं, मोरे यांच्या मुलीची आणि जावयाची, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याची अनेक दिवसांपासून इच्छा होती. ही इच्छा ते वारंवार मोरे यांच्याकडं व्यक्त करत होते. मात्र लेकीचा आणि जावयाची इच्छा अजितदादांना सांगण्याची चोपदार विलास मोरे यांची हिंमत होत नव्हती.

मात्र, तो योग जुळून येत नव्हता. अखेर वेळापत्रक व्यस्त असूनही  दुसऱ्या दिवशीच भेटायला बोलवलं. अजितदादांची परवानगी आणि वेळ मिळाल्यानंतर चोपदारांची मुलगी स्नेहा आणि जावई गणेश यांनी काल अजितदादांची भेट घेतली. चोपदार विलास मोरे यांची मुलगी आणि जावयाला फक्त भेट दिली नाही, तर संवाद साधला.

दरम्यान, संवाद साधताना दादांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. मुंबईत कुठे राहता. कुठल्या शाळेत शिकलात. अमेरिकेत कधी गेलात. अमेरिकेत कुठे राहत होता. तिथं कामाची वेळ, स्वरूप कसं असतं. तिथं छोट्या बाळाला कोण सांभाळतं, असे प्रश्न विचारले. लग्न कसं जमलं, लव्ह की अरेंज मॅरेज ? हा प्रश्नही अजित पवारांनी विचारला.

महत्त्वाच्या बातम्या
मंत्र्याला हनी ट्रॅपमध्ये अडवण्याचा प्रयत्न फसला; मॉडेलच्या एका चुकीमुळे झाली पोलखोल
हनिमूनच्या रात्रीचं पत्नीला कळालं IAS पतीचं ‘ते’ भयानक सत्य, तरी ३२ वर्ष गप्प बसून करत होती मुकाट्याने संसार
VIDEO: गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये टाकून हॉस्टेलच्या बाहेर पळवणाऱ्या तरुणाला पकडलं; लोक म्हणाले, रिस्क है तो इश्क है
नाशिकमध्ये पतीची हत्या करण्यामागे पत्नीचा आणि डोसावाल्याचा हात; ‘असा’ झाला खुलासा