काही दिवसांपूर्वीच पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला. मनसेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रूपाली पाटील यांनी मनसेला घरचा आहेर देत राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला. राज्यभरात रूपाली पाटील या मनसेच्या आक्रमक महिला नेतृत्व म्हणून राज्यभर परिचित होत्या. मात्र त्यांनी आता राष्ट्रवादी पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. (ajit pawar gives lesson of ncps style of work to rupali patil)
अशातच शनिवारी सायंकाळी पुण्यात बैठकानिमित्त आलेल्या अजित पवार आणि रुपाली पाटील यांच्यात भेट झाली. तेव्हा बदलत्या राजकीय स्थिती लोकांशी कसा संवाद ठेवायचा, आपल्या बोलण्यातून कोणताही घटक दुखावला जाणार नाही आणि त्याचे परिणाम आपल्या वाट्याला येणार नाहीत, याकडे लक्ष देण्याबाबत अजितदादांनी रुपाली पाटील सूचना केल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मनसेला रामराम ठोकताना रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर तोच आक्रमकपणा कायम राहील, असा इशारा विरोधकांना दिला होता. पण त्यांची ही मनसे स्टाईल राष्ट्रवादीत चालणार नाही, असे राष्ट्रवादीच्या शिस्टीचे धडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती मिळत आहे.
तसेच दरम्यान, सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर पाटील यांनी विरोधकांना लक्ष केले होते. ‘राज ठाकरे हे माझे दैवत आहेत, होते आणि राहतील. मी संघर्ष करणारी आणि सर्वसामान्यांवर प्रेम करणारी सर्वसामान्य कार्यकर्ती आहे. मनसेमध्ये मी राज ठाकरेंकडे बघून राजकारणात आले. संदीप देशपांडे आणि वंसत मोरे आम्ही तिघांनी भावंडं म्हणून काम केले आहे,’ असे त्या म्हणाल्या होत्या.
संदीप देशपांडे, वसंत मोरे काही बोलले असतील, संदीप देशपांडेंना मी आता उत्तर देणे म्हणजे त्यांना दुखः होईल. योग्य वेळ आल्यावर मी सर्वांना उत्तर देईन. १४ वर्षे काम करत असताना माझ्याकडून सर्वसामान्य लोकांना अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करत असताना माझ्या पक्षाला, माझ्या नेत्याला त्रास होऊ नये, अशी भूमिका आहे, असे रूपाली पाटील म्हणाल्या.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे नेत्या रुपाली पाटील या पुण्यातील मनसेचे नेते किशोर शिंदे आणि बाबू वागसकर यांच्यावर नाराज होत्या. या दोघांनाही काम नसून रिकामटेकडे असल्याची टीका त्यांनी पत्रकर परिषदेत केली आहे. त्यांनी याबाबत उघडपणे नाराजी देखील जाहीर व्यक्त केली होती. त्यांनंतर त्यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमाला देखील हजेरी लावली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या
‘असे न केल्यास आम्हाला आनंद होईल’, वामिकाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनुष्का भडकली
VIDEO: एक चुम्मा तु मुझको उधार दे.., गाण्यावर नाचताना युवकाचा मृत्यु, लोकांना वाटलं मस्करी करतोय
कुंकू लावायच्या आधीच नवरीला कळलं नवरदेवाचं ‘ते’ सीक्रेट, मंडपातून माघारी पाठवली वरात
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; ‘या’ कारणामुळे ‘अला वैकुंठपुरमलो’ सिनेमागृहात होणार नाही प्रदर्शित