Share

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेवर अजित पवारांनी व्यक्त केली शंका; म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार होणार असेल तर…

एक महिना उलटून गेला तरी नव्याने स्थापन झालेल्या सरकारचे मंत्रिमंडळ तयार झाले नव्हते. मात्र आता याच मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला आहे. उद्या ११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. (Ajit Pawar expressed doubt on the discussion of cabinet expansion)

मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार असल्याची चर्चा अनेक वृत्तमाध्यमांतून चर्चिली जात आहे. मात्र विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले की, ‘उद्या मंत्रिमंडळ विस्ताराची दाट शक्यता असली तर त्याबाबत आम्हाला कळवले जाते.’

‘तसे पत्र सचिवांकडून पाठवले जाते. मात्र असे कोणतेही पत्र आम्हाला अजून आलेले नाही. पुढे अजित पवार म्हणाले की, ‘उद्या मंत्रिमंडळ विस्तार असल्याच्या बातम्या अनेक वृत्त वाहिन्यांवरून चालवल्या जात आहेत. मात्र मंत्रिमंडळ विस्तार असेल तर त्याचे निमंत्रण आम्हाला दिले जाते. अजून ते आले नाही मात्र उशिरा पण येऊ शकते.’

पुढे ते म्हणाले की, मागील काही दिवसांपासून मंत्रिमंडळ करायचे ,कसे करायचे, हेच आपण ऐकत आलोय. ते लवकर होईल, असेच बोलले जायचे. त्या दोघांची दिल्लीवारी झाली आहे. ते नंदनवनला बसून आहेत. त्यामुळे उद्या मंत्रिमंडळ विस्ताराची दाट शक्यता वाटते, असे पवार म्हणाले.

‘विस्ताराबाबत अधिकृत माहिती समजली नाही. मात्र त्यांच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी उद्या मुंबईत बोलावले आहे. त्यावरून उद्या विस्तार होण्याची शक्यता दिसते. परंतु उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. ती लवकरात लवकर घेण्याची त्यांची घाई दिसते,’ असे देखील अजित पवार म्हणाले.

सरकारकडून मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया राबवली जात आहे. तरी येत्या काळात न्यायालय कायदेशीर पेचप्रसंगांवर कोणता निर्णय देते. यावर या मंत्रिमंडळाचे पुढील भवितव्य निश्चित होणार असल्याचे दिसते.

महत्वाच्या बातम्या-
Kapil Sibal: सुप्रीम कोर्टाकडून कोणतीच अपेक्षा उरली नाही कारण.., कपील सिब्बल यांचं रोखठोक वक्तव्य
Eknath Shinde: दोन दिवसात होणार मंत्रिमंडळ विस्तार, शिंदे गटाकडून ‘या’ नेत्यांना मिळणार बंडखोरीचे गिफ्ट
Karan Mehra: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या ‘नैतिक’ने आपल्या पत्नीवर केले गंभीर आरोप, म्हणाला – ज्या भावासोबत ती राखी बांधायची त्याच्यासोबत…

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now