Share

लिहायचं होतं ‘देहू’ झालं ‘जुहू’, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आंदोलनादरम्यान पचका, वाचा काय घडलं?

ncp

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. अशात ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देहूत आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी भाषण देत लोकांना संबोधित केलं.

पण मोदींची देहू भेट एका वेगळ्याच कारणामुळे सर्वात जास्त चर्चेत आली आहे. ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषणाची संधी न देणे.  या कार्यक्रमावेळी पंतप्रधानांचे भाषण झाले, पण अजित पवारांना भाषणाची संधी दिली गेली नाही.  अजित पवार राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित झाले होते.

तसेच या कार्यक्रमाला भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्यात फडणवीसांनी भाषण केले होते. अजित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूलाच बसलेले होते. तर दुसऱ्या बाजूला फडणवीस बसलेले होते. यावेळी सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं.

त्यानंतर सुत्रसंचालकांनी थेट मोदींचे नाव घेतले. त्यामुळे मोदी भाषणाला गेले. अजित पवारांना भाषणाची संधी दिली गेली नसल्यामुळे राजकारणातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. अशातच एक वेगळी बातमी समोर येत आहे.

देहूतील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी जळगावात राष्ट्रवादीच्या महानगर महिला आघाडीनं आंदोलन केलं. हे आंदोलन आता चांगलच चर्चेत आलं आहे. वाचून तुम्हालाही थोडा धक्काच बसेल. त्याचं झालं असं, आंदोलकांच्या हातातील बॅनरवर देहू ऐवजी जुहू (मुंबई) असा उल्लेख करण्यात आला होता.

या कारणामुळे सध्या हे आंदोलन चांगलच चर्चेत आलं आहे. आंदोलन सुरू होतं, घोषणाबाजी देखील सुरू होती मात्र ही एवढी मोठी चूक कोणाच्याच लक्षात आली नाही. काही वेळाने येथे बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिसाच्या लक्षात ही चूक आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी लगेच बॅनर गुंडाळून ठेवला.

दरम्यान, चुकीच्या बॅनरमुळे त्यांनी आंदोलन अवघ्या काही मिनिटांतच उरकलं. मात्र या आंदोलनाची चर्चा अजूनही राज्यात सुरू आहे. एकीकडे देहूत घडलेल्या प्रकाराची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या या आंदोलनाची चर्चा सुरू आहे. यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
अग्निपथ योजनेविरूद्ध संतापाची लाट, तरुणांनी रस्त्यावर उतरून केली जाळपोळ अन् तोडफोड
कौतुकास्पद! वडिलांचं निधन झाल्यानंतर नाही ठेवलं जेवण, त्याच पैशातून नदीवर बांधला पूल
क्रिकेट खेळण्यासाठी कॅन्सरशी लढला अन् ठोकल्या ५४८ धावा, पुर्ण देशात ‘या’ नव्या युवराजची चर्चा

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now