Share

ajit pawar : “ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणं ही बेईमानी”, अजित पवार स्पष्टच बोलले

ajit pawar

ajit pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच रंगलेले पाहायला मिळत आहे. सत्ताधारी, विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सध्या पाहायला मिळत आहे.

विरोधक देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कसून कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे कालपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय मंथन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून विरोधक सत्ताधारी नेत्यावर निशाणा साधत आहे.

याच कार्यक्रमादरम्यान, माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी शिंदे सरकारला धारेवर धरले आहे. ‘ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणे ही बेईमानी जनतेला पटलेली नाही,’ असं म्हणत अप्रत्यक्षपणे अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

अजित पवार म्हणतात, ‘शिंदे – फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत. त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. जे पक्ष सोडून गेले ते आज अस्वस्थ आहेत. ते नेते तसे बोलून दाखवत असल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकार पडणार. तसेच 145 चा आकडा कमी झाला की सरकार पडणार, असे देखील अजित पवार यांनी म्हंटलं आहे. सध्या अजित पवारांच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली असून अद्याप सत्ताधारी नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

महत्वाच्या बातम्या-
Indian Team : पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेंशन वाढलं, सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी उरलाय फक्त ‘हा’ एकमेव मार्ग
Vaishali Suryavashi : खबरदार! यापुढे माझ्या वडीलांचा फोटो लावला तर…; शिंदेगटातील आमदारावर बहीण भडकली
Team India : ‘हे’ पाच खेळाडू ठरलेत टीम इंडियाच्या विजयाचे हिरो; भन्नाट खेळी खेळत राखली संघाची लाज

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now