महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे मोठा गोंधळ माजला आहे. त्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ आपले राज्यपाल भगतशिंग कोश्यारी यांना कोरोना झाला, उपचारासाठी ते काही दिवस हॉस्पिटलमध्ये होते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना झाल्याचे समजते. ट्विट करून तशी माहिती स्वतः अजित पवार यांनीच दिली आहे. (Ajit Pawar contracted corona while power struggle )
काल, मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे, असे ट्विटरच्या माध्यमातून अजित पवार यांनी सांगितले. सध्या जे अस्थिरतेचे वातावरण राज्यात निर्माण झाले आहे, अशा प्रसंगी राज्याच्या महत्वाच्या पदांवरील व्यक्तींना कोरोनाची लागण होणे, ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे.
अजित पवार पुढे असे म्हणाले की, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. अशा प्रकारे कोरोनाची लागण झाली असताना बरं होऊन लोकांच्या सेवेत लवकरच परतण्याचा निर्धार त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतो आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर अजित पवारांवर अनेक आरोप बंडखोरी केलेल्या आमदारांसहित काँग्रेसमधील लोकांनी देखील केले. त्याचे प्रतिउत्तर देण्यासाठी कालपर्यंत अजित पवार माध्यमांसमोर येऊन बोलत होते. आज मात्र त्यांनी ट्विट करत कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे महाविकास आघाडी हदरली आहे. शिवसेनेचे ४९ आमदार आज गुवाहाटीत तळ ठोकून आहेत. शिवसेनेकडून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु असतानाच त्यांच्या या बंडाळीबद्दल प्रचंड नाराजी पण आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंवर असा कठीण प्रसंग ओढावला असताना त्यांना कोरोना झाल्यामुळे ही परिस्थिती अधिक बिकट झाल्याचे दिसते.
निर्णय प्रकियेचा, सध्याच्या सरकारचा महत्वाचा घटक असणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कोरोना झाल्यामुळे राज्यात निर्माण झालेला जो राजकीय पेच आहे. तो केव्हा सुटेल, याबाबत सध्या सामान्य जनता साशंक असल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या-
पुरुषांच्या ‘या’ पाच वाईट सवयींमुळे कमी होतो sperm count ! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची धडपड! फडणवीसांना दोन वेळा फोन; वाचा नेमकं काय घडलं
जसास तसे! शिकाऱ्याने अस्वलाला मारली गोळी, मरण्यापुर्वी अस्वलाने ‘असा’ घेतला बदला; वाचून थक्क व्हाल





