अजितदादांचा संताप अनावर; म्हणाले, तू कुणाची सुपारी घेऊन आलाय का? असं चालणार नाही

आज देशभरात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या आनंदात साजरी होतं आहे. राज्यात दरवर्षी शिवजयंतीनिमित्त (19 फेब्रुवारी )रोजी उत्सवाचं वातावरण असतं. गावागावात महाराजांचे पोवाडे गायले जातात, व्याख्यानं ठेवली जातात. आज मध्यरात्रीपासून फटाक्यांची आतिषबाजी होत आहे, पाळणा गाऊन महाराजांच्या जन्माचे स्वागत केले जात आहे, मिठाई वाटली जात आहे. (ajit pawar attacks maratha youth over maratha reservation)

तसेच सोशल मीडिया शिवमय झाला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महाराजांना मानवंदना देण्यात येत आहे. शिवनेरी गडावर आज शिवजयंतीचा दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संभाजी छत्रपती उपस्थित होते.

तसेच यावेळी सभेचा कार्यक्रमही झाला. त्यावेळी अजित पवारांचं भाषण सुरू असताना काही तरुणांनी मराठा आरक्षणाचा विषय छेडून अजितदादांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर भरसभेत अजित पवारांनी मराठा तरुणांना झापले. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतं आहे.

त्याचं झालं असं, अजित पवार बोलण्यास उभे राहिल्यावर प्रेक्षकांमधील एका तरुणाकडून मराठा आरक्षणासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर पवारांनी त्या व्यक्तीला खाली बसायला सांगितले. तसेच त्या व्यक्तीवर अजित पवार संतापल्याचे पाहायला मिळाले. तू कोणाची सुपारी घेऊन आलाय का? असे त्या व्यक्तीला खडसावत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, आम्ही पण मराठ्याच्या पोटीच जन्माला आलो आहोत ना. मग आम्हाला आमच्या जातीचा आणि समाजाचा अभिमान नाही का? तरुण मुलांचं रक्त सळसळतं असतं. पण मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. यामधील कायेदशीर बारकावेही लक्षात घेतले पाहिजेत, असे अजित पवार यांनी म्हटले.

तसेच यावेळी अजित पवारांनी संभाजीराजे छत्रपती यांनीही मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या उपोषणाच्या भूमिकेवर फेरविचार करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. याचबरोबर शिवभक्त देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या
पहिल्याच भेटीत दोन मित्रांच्या बायकांचे एकमेकांवर जडले प्रेम, पतींना घटस्फोट देत उचललं मोठं पाऊल
गुगलवर सर्च करत होता ‘कॉल गर्ल’, युवकासोबत पुढं जे घडलं ते वाचून धक्का बसेल
मालवाहू जहाजाला आग, ४००० पोर्शे, लॅम्बोर्गिनी, बेंटली कार्स बुडाल्या; कंपनीचे हजारो कोटींचे नुकसान
जय शिवराय! देवरूखात अवघ्या ३ सेंटिमीटरमध्ये साकारले शिवराय; पठ्ठ्याने केला विश्वविक्रम