याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘आमच्याकडून मिरवणूक निघत असताना त्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत,दगड आम्हालाही हातात घेता येतो,समोर जे कोणतं हत्यार असेल ते आमच्याही हातात द्यायला लावू नका, असा इशारा राज यांनी दिल्लीतील हिंसाचावरुन दिली आहे.
आजच्या पत्रकार परिषदेत देखील राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे म्हणतात, ‘देशभरातल्या हिंदू बांधवांनो तयार राहा,३ मे पर्यंत जर त्यांना समजले नाही तर जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे. मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “विविध धर्माच्या लोकांनी एकमेकांच्या सणांमध्ये, उत्साहात, जयंतीत सहभागी झालं पाहिजे, सर्वांनी एकोपा टिकवला पाहिजे, जाती-धर्मात तेढ निर्माण होणार नाही, सगळे गुण्या गोविंदाने नांदतील असा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे.”
‘हेच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सर्वांना सांगितलं आहे. म्हणूनच आपला भारत देश एकसंघ पहायला मिळतो,” असं म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरेंना आठवण करून दिली आहे. दरम्यान, शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर आज राज ठाकरे पत्रकार परिषदे घेतली.
यावेळी, ‘महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोत. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही, असेही राज यांनी स्पष्ट केले. ‘माझ्या सभेमध्ये मी स्पष्ट केले होते की, हा सामाजिक विषय आहे. त्याच्याकडे त्याच अंगाने पाहणे आवश्यक असल्याचे राज यांनी सांगितले.