महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली होती. गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी (Nationalist)काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार(Ajit Pawar) भारतीय जनता पार्टीत (Bharatiya Janata Party) प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. या प्रकरणात आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडी घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली. त्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होण्याची चिन्ह दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. तर अजित पवार राष्ट्रवादीला रामराम ठोकू भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार का? या प्रश्नाचे उत्तर देत अजित पवार यांनी चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
माध्यमातील वृत्तनुसार, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ४० आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. याचे पत्र अजित पवार यांच्याकडे आहे. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राजकारणातील या घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केला आहे.
संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीची एकजूट ही भाजपाच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे भाजपकडून अजित पवार यांच्या नावाच्या वावड्या उडवल्या जात आहेत. आमची आघाडी मजबूत आहे. ती पाहून त्यांच्या पायाखालची माती सरकली आहे. त्यामुळे ही आघाडी खिळखिळी करण्याचे कारस्थान रचले जात आहे. पण महाविकास आघाडीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
तसेच, अजित पवारांनी माझ्यावर टीका केली असेल का, नाही. हे मला माहित नाही. अजित दादा यांची ठरवून बदनामी केली गेली. शिवसेनेमध्ये फूट पाडली जात होती, तेव्हा शरद पवारांपासून अजित पवारांनी भूमिका घेतली. तीच भूमिका आम्ही राष्ट्रवादीबाबत घेतली, त्यात चुकीचं काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला. त्याचवेळी दबाव आणून पक्ष फोडले जात आहेत. हेच सत्य आहे. यात लपवण्यासारखं काय आहे? असेही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या वावड्या असल्याचं संजय राऊत यांनी म्हटल होतं. या मुद्द्यावर बोलताना स्वतः अजित पवार यांनी संजय राऊत यांना नाव न घेता खोचक टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले, आम्ही भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र दुसरं कोणी घेण्याचे कारण नाही.
महत्वाच्या बातम्या
सचिनच्या पोराने वाचवली रोहितची लाज, थरारक सामन्यात मुंबईने हैद्राबादला 14 धावांनी हरवले; ‘हे’ ठरले विजयाचे हिरो
‘मी एकनाथ शिंदेंचा फॅन’; ठाकरेंच्या बड्या नेत्याकडून जाहीर कौतुक; ठाकरे गटाला पडणार मोठे खिंडार
२ आठवड्यात दिल्ली आणि महाराष्ट्रात दोन राजकीय स्फोट होणार”; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट