Share

अजिंक्य रहाणेचा संयम सुटला! टिम इंडीयात संधी मिळत नसल्याने ‘या’ देशाच्या संघाकडून खेळणार

ajinkya rahane

भारतीय क्रिकेट संघात स्वत:ची जागा बनवण्यापेक्षा संघात स्वत:ची जागा टिकवून ठेवणे कठीण झाले आहे. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करावी लागत आहे. तरच त्याला पुढील सामन्यात स्थान मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक खेळाडूंना संघातून बाहेर पडावे लागत आहे.

अनेक खेळाडू असे आहेत जे आपल्याला रणजीमध्ये सिद्ध करत आहे, त्यानंतर त्यांना भारतीय संघात संधी दिली जात आहे. पण काही खेळाडू असे आहेत, ज्यांना भारतीय संघात स्थान मिळवणे कठीण झाले आहे. त्यातलाच एक म्हणजे अजिंक्य रहाणे. त्याला बीसीसीआय भारतीय संघात संधी देत नाहीये. त्यामुळे आता तो दुसऱ्या देशाकडून खेळणार आहे.

अजिंक्य रहाणे यंदा इंग्लंडमध्ये होणाऱ्या काऊंटी क्रिकेटमध्ये लीसेस्टरशायरच्या संघात खेळार आहे. रहाणेने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. मंगळवारी क्लबकडून जाहीर करण्यात आलेल्या घोषणेनुसार, तो इंडियन प्रीमियर लीगनंतर आठ काऊंटी सामने आणि वनडे सामने खेळणार आहे.

रहाणेने लीसेस्टरशायरवर बोलताना म्हटले की, आगामी सिजनसाठी लीसेस्टरशायरमध्ये सामील होताना मला आनंद होत आहे. मी माझ्या नवीन सहकाऱ्यांसोबत खेळण्यासाठी आणि लीसेस्टर शहराचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहे.

रहाणेने २०१९ मध्ये हॅम्पशायरचे प्रतिनिधित्व केले होते, त्याने काऊंटी पदार्पणात नॉटिंगहॅमशायरविरुद्ध शतक झळकावले होते. या रणजी मोसमात मुंबईचे नेतृत्व करताना त्याने सात सामन्यांमध्ये ५७.६३ च्या सरासरीने ६३४ धावा आणि एक द्विशतक केले आहे. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.

रहाणेने आंतरराष्ट्रीय स्तरावर ८००० हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यामध्ये कसोटीत १२ आणि वनडेमध्ये ३ शतके आहेत. त्याने ८२ कसोटींमध्ये ३८.५२ च्या सरासरीने ४.९३१  धावा आणि ९० एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५.२६ च्या सरासरीने २९६२ धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
अदानीच नाही तर ‘या’ १६ कंपन्यांची हिंडनबर्गने लावली वाट, रिपोर्टमधून ‘असे’ कमवतात करोडो रुपये 
सोशल मीडियावर व्हायरल झाला ब्राम्हण कुकीजचा फोटो; लोक म्हणाले…
अदानींचं नशीब फळफळलं! कोट्यवधींचे नुकसान होऊनही ‘या’ कंपनीने पुन्हा केली हजारो कोटींची गुंतवणूक

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now