मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रमेश देव यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी जगाचा निरोप घेतला. ह्रदयविकाच्या झटक्याने २ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. रमेश देव यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या त्यांचे कुटुंबीय कठिण काळातून जात आहेत. यादरम्यान रमेश देव यांचे चिरंजीव अभिनेता अजिंक्य देव आपल्या वडिलांच्या आठवणीत भावूक झाले (Ajinkya Deo about Ramesh Deo)आहेत.
अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावर वडिल रमेश देव यांचा एक फोटो शेअर करत त्यांना सर्वात सुंदर माणूस असल्याचे म्हटले आहे. ट्विटवर त्यांनी रमेश देव यांचा जुना फोटो शेअर करत लिहिले की, ‘सर्वात हँडसम माणूस.. माझे वडिल श्री रमेश देव’. अजिंक्य देव यांच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत रमेश देव हे उत्तम कलाकार होते, असे सांगत आहेत.
Most Handsome man .. my Father Shri. Ramesh Deo 🙏 pic.twitter.com/CsI3BYDvnX
— Ajinkya Deo (@Ajinkyad) February 10, 2022
रमेश देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव खूपच भावूक झाले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी रमेश देव यांचे जाणे हे त्यांच्या कुटुबीयांच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच बाबांचे जण्यावर प्रचंड प्रेम होते. त्यांना खूप जगायचं होतं. पण नियतीला ते मान्य नव्हते. परंतु त्यांनी त्यांचे आयुष्य पूर्णपणे त्यांच्या मूल्यांवर जगलं. त्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास सुखद होण्यासाठी प्रार्थना करा, असे त्यांनी यावेळी म्हटले होते.
दरम्यान, रमेश देव यांनी आपले पूर्ण जीवन चित्रपट आणि अभिनयाला समर्पित केलं होतं. १९५१ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. ‘पाटलाची पोर’ या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. १९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांत काम केले.
https://twitter.com/Ajinkyad/status/1306455009417191424?s=20&t=3KadfXq4xycfIC6dUW_2jw
मराठीसोबत हिंदी भाषेतील अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवले. १९६२ साली आलेल्या ‘आरती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांसोबत काम केले. रमेश देव यांनी त्यांच्या कारकिर्दीत ‘पैशाचा पाऊस’, ‘भाग्य लक्ष्मी’, ‘दस लाख’, ‘मुजर्मि’, ‘खिलोना’, ‘जीवन मृत्यु’, ‘शेर शिवाजी’, ‘दिलजला’, ‘कुदरत का कानून’, ‘गोरा’, ‘आनंद’, ‘घराना’ यासारख्या अनेक चित्रपटांत काम केले.
रमेश देव यांच्या पत्नी सीमा देव यासुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहेत. १९६२ साली आलेल्या ‘वरदक्षिणा’ या चित्रपटादरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याचवर्षी दोघांनी लग्नगाठ बांधली. २०१३ साली या दोघांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाले. यावर्षी ते लग्नाचा ५९ वा वाढदिवस साजरा करणार होते. पण त्यापूर्वीच रमेश देव यांनी जगाचा निरोप घेतला.
महत्त्वाच्या बातम्या :
आपल्या सर्वांचा लाडका ‘शक्तिमान’ पुन्हा येणार रुपेरी पडद्यावर, टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
‘तु आई कधी होणार?’ असा प्रश्न विचारणाऱ्या ट्रोलरला सामंथाने दिली थेट बाळंतपणाची तारीख, म्हणाली..
वडिलांचे निधनाने दुखा:त बुडाली अभिनेत्री रविना टंडन; म्हणाली….