BJP : आपल्या देशातील राजकारणावर नेहमीच धनवान आणि गुंडगिरी प्रवृतीच्या लोकांचे वर्चस्व राहिलेले आहे. राजकारणात सतत अशा गुंड प्रवृतीच्या लोकांचा वावर वाढत आहे. राजकीय पक्षांनाही अशा गुंड प्रवृतीच्या लोकांचा राजकीय फायदा मोठ्या प्रमाणावर मिळतो.
त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवरचे पक्षसुध्दा अशा लोकांना आपल्या पक्षात सहभागी करून घेत असतात. असाच काहीसा प्रकार चंद्रपूरमध्ये घडला आहे. भाजपने चंद्रपूर शहरात एका हत्येचा आरोपी असलेल्या व्यक्तीला आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे.
या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या पक्ष प्रवेशावेळी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. ज्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आला आहे, त्याच्यावर हत्या आणि अपहरणाचे तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत.
या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचे नाव आहे अजय सरकार. हा व्यक्ती सध्या कार्यकाळ संपलेल्या चंद्रपूर महानगर पालिकेचा माजी नगरसेवक आहे. या व्यक्तीचे शहरातील बंगाली कॅम्प भागात मोठे वर्चस्व आहे. त्याच्यावर या भागात गुन्हेगारी टोळी चालवण्याचा आरोप आहे.
तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाने त्याला आपल्या पक्षात स्थान दिले आहे. त्यामुळे चंद्रपुरातील शहर वासियांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अजय सरकार यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुका थोड्याच दिवसांत होणार आहेत. त्यादृष्टीने भारतीय जनता पक्ष तयारीला लागलेला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा स्थानिक पातळीवरील लोकांना आपला पक्षात सहभागी करून घेत आहे. यामुळेच भारतीय जनता पक्षाने अपक्ष नगरेवक अजय सरकारला आपल्या पक्षात सामील केले आहे.
महत्वाच्या बातम्या
Shivsena : शिवसेना का सोडली? छगन भुजबळांनी केला मोठा खुलासा, म्हणाले, त्यावेळी बाळासाहेबांनी…
BJP: शिंदे गटामुळे भाजपला पडणार खिंडार? सांगलीचे निष्ठावंत कार्यकर्ते भाजप विरोधातच करणार आंदोलन
Devendra Fadanvis : राज ठाकरेंच्या पत्रावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आम्ही नक्कीच….
Mumbai Election: मुंबईच्या महापालिका निवडणूकीसाठी शिवसेनेने आखलाय मास्टर प्लॅन; अखिलेश-तेजस्वी सुद्धा देणार साथ?