Share

जेव्हा तुम्ही ती कथा ऐकता तेव्हा.., आता अजय देवगणनने द काश्मिर फाईल्सवर केले मोठे वक्तव्य

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने (Ajay Devgan) काश्मिरी पंडितांच्या वेदनादायक इतिहासाची उजळणी करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटावर आपले मौन सोडले आहे. विवेक अग्निहोत्रीचा हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटून गेले आहेत आणि या चित्रपटाबद्दल बॉलिवूडच्या कॉरिडॉरमधून काही आवाज ऐकू येत आहेत.(Ajay Devgnan made a big statement on The Kashmir Files)

बॉलिवूडच्या या मौनावरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यापूर्वी अक्षय कुमार आणि आमिर खान सारख्या स्टार्सनी द काश्मीर फाइल्सबाबत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि आता या यादीत अजय देवगणचे नावही जोडले गेले आहे. त्याच्या आगामी ‘रनवे 34’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अजय देवगणने विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाच्या यशाबद्दल आपले मत मांडले आहे.

‘रनवे 34’ च्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी अजय देवगणला द काश्मीर फाइल्सच्या यशाचे रहस्य विचारण्यात आले. अजय देवगणला थेट प्रश्न विचारण्यात आला की, आजकाल फक्त सत्य घटनांवर आधारित कथाच प्रेक्षकांना रंगभूमीवर आणू शकतात का? या प्रश्नावर अजय देवगण म्हणाला, नाही, असे नाही, हे फक्त भारतातच नाही.. संपूर्ण जगात आहे.

अजय देवगण पुढे म्हणतो की, मी यापूर्वी असे चित्रपट केले आहेत. द लिजेंड ऑफ भगतसिंग सारख्या काही कथा खूप इंस्पिरेशनल असतात आणि काहीवेळा सत्य इतके आश्चर्यकारक असते की आपण अशा काल्पनिक कथा लिहू शकत नाही. अजय देवगण पुढे म्हणाला, यामध्ये आयडिया ही नाही की खरी घटना शोधायला पाहिजे. जेव्हा तुम्ही ती कथा ऐकता तेव्हा तुम्हाला असे वाटते की ही अतिशय विलक्षण गोष्ट घडली आहे आणि हे सत्य जगासमोर यायला पाहिजे, ही खरी महत्वाची कल्पना आहे. नाहीतर कथा स्वतः बनवून लिहू शकतो.

तसेच दिल्लीत एस.एस. राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमात आमिर खानने काश्मीर फाईल्सबद्दल आपलं मत मांडलं. तो म्हणाला होता की, असा चित्रपट आणि तो ज्या विषयावर बनवलेल्या आहे, तो प्रत्येक भारतीयाने पाहिलाच पाहिजे. तसेच प्रत्येक भारतीयाने हे लक्षात ठेवले पाहिजे की एखाद्या व्यक्तीवर अत्याचार होतो तेव्हा त्याला कसे वाटते.

अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या चित्रपटाने दोन आठवड्यांत 179.85 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात 12 कोटींपेक्षा कमी कमाई केलेली नाही. असे असताना या चित्रपटाने अक्षय कुमारच्या सूर्यवंशी, 83 आणि हॉलिवूड चित्रपट स्पायरमॅनला धूळ चारली आहे. या वीकेंडआधीच विवेक अग्निहोत्रीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार करेल.

महत्वाच्या बातम्या-
धोनीसोबतच्या मतभेदांवर गौतम गंभीर स्पष्टच बोलला, म्हणाला, १३८ कोटी लोकांसमोर मी सांगतो की..
पुतीन यांना मनोरुग्ण म्हणणाऱ्या मॉडेलचा मृतदेह आढळला सुटकेसमध्ये, आरोपीने केले धक्कादायक खुलासे
लहान मुलांच्या झोक्यावर खेळण्याची मस्ती तरुणांना पडली महागात; व्हिडिओ पाहाल तर हसून-हसून लोटपोट व्हाल
औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकणाऱ्यांसोबत मेलो तरी जाणार नाही, उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट 

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now