बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgan) 2 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. अजय देवगण म्हणजेच विशाल देवगणचा जन्म 2 एप्रिल 1969 रोजी झाला. अजयचा जन्म पंजाबमध्ये झाला. त्यांचे कुटुंब हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक आहे. अजय देवगण जेव्हा 22 वर्षांचा होता तेव्हा त्याने ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून पदार्पण केले होते.
आज तो हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या स्टार्सपैकी एक आहे. गंभीर भूमिकांपासून ते अॅक्शन आणि कॉमेडीपर्यंत, अजय देवगण विविध पात्रांमध्ये आपला जीव ओततो. कदाचित त्यामुळेच त्याला दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. अजय त्याच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठीही ओळखला जातो.
अजय देवगण हा अशा भारतीय अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांच्याकडे स्वतःचे खाजगी जेट आहे. हॉकर 800 असे या खासगी जेटचे नाव आहे. त्यांनी 2010 मध्ये 6 सीटर खाजगी जेट खरेदी केले होते. त्याची किंमत 84 कोटी रुपये आहे. शूटिंग, प्रमोशन आणि वैयक्तिक ट्रीपसाठी तो त्याचा वापर करताना दिसतो.
अजय देवगण मुंबईत शिवशक्ती बंगल्यात राहतो. त्यांचा बंगला मुंबईतील पॉश एरिया जुहू येथे आहे. हा बंगला आतून आणि बाहेरून खूप सुंदर दिसतो. त्याची किंमत सुमारे 30 कोटी आहे. अजय तिथे त्याच्या संपूर्ण कुटुंबासह येथे राहतो. अजय देवगणच्या या बंगल्यात जिम, स्विमिंग पूल, मिनी थिएटर, लायब्ररी आणि स्पोर्ट्स रूम देखील आहे. अजय देवगण पार्ट्यांना जात नाही असे तुम्ही ऐकले असेलच. याशिवाय तो हायफाय होण्याचेही टाळतो आणि त्याचा साधेपणा चाहत्यांना भुरळ घालतो.
त्यांच्या घराचे दर्शनही त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाची जाणीव करून देते. अजय हा भगवान शिवाचा मोठा भक्त आहे, म्हणून त्याने आपल्या बंगल्याला ‘शिवशक्ती’ असे नाव दिले आहे. या बंगल्यात चार बेडरूम आहेत. सर्व बेडरूम प्रत्येकाच्या आवडीनुसार डिझाइन केल्या आहेत. अजय देवगण आणि काजोल यांनी भिंतीपासून ते फ्लोअरिंगसाठी पांढरा रंग निवडला आहे.
अजयचे लंडनच्या पार्क लेनमध्ये एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत 54 कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांचा मुंबईत आणखी एक प्लॉट आहे, ज्याची रजिस्ट्री त्यांनी नुकतीच केली आहे. अजय देवगणकडे MESERATI QUATTROPORTE कार आहे. ही कार विकत घेणारा अजय पहिला भारतीय आहे. याशिवाय त्याच्याकडे रेंज रोव्हरसह अनेक वाहने आहेत, ज्यांची किंमत करोडोंची आहे.
महत्वाच्या बातम्या-
सावळे लोक अभिनय करू शकत नाही का? बॉलिवूडमधील वर्णभेदावर नवाजुद्दीनने साधला निशाणा
नशीबाचा खेळ! मुलीने सरकारी नोकरीसाठी केली ६.७० लाखांची पुजा, पण मिळालीच नाही नोकरी
मिलिंद गवळी यांना अभिनयात यश मिळावं, यासाठी त्यांच्या सासूबाई करायच्या हे काम; अभिनेत्याने सांगितला किस्सा
काय सांगता! या पेनी स्टॉकमुळे ८ लाखांचे झाले ३ कोटी; ३ वर्षात दिला तब्बल ३५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा