Share

‘फूल और कांटे’मधून हिट झालेला अजय देवगण आहे ‘एवढ्या’ कोटींचा मालक, प्रायवेट जेटमधून करतो प्रवास

अजय देवगणने (Ajay Devgn) वयाच्या २२व्या वर्षी ‘फूल और कांटे’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अजय देवगण आज एक यशस्वी बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. अजयने १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून भरपूर संपत्तीही कमावली आहे. अॅक्शन कोरिओग्राफर आणि फिल्म डायरेक्टर वीरू देवगणचा मुलगा अजय देवगण याने बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री काजोलसोबत लग्न केले आहे.

अजय देवगण बऱ्याच काळापासून फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहे, पण एक-दोन अफवा बाजूला ठेवल्या तर अजयच्या लव्ह लाईफबद्दल कोणतीही गॉसिप ऐकू येत नाही. अतिशय शांत आणि गंभीर अभिनेता अजय आणि बॉलीवूडची बबली अभिनेत्री काजोल आनंदी आयुष्य जगत आहेत. त्यांना न्यासा आणि यश ही दोन मुले आहेत. फॅमिली मॅन अजय विलासी जीवनशैली जगतो.

अजय आपल्या कुटुंबासोबत मुंबईच्या ‘शिवशक्ती’ या पॉश बंगल्यात राहतो, जो जुहूच्या पॉश भागात असलेला अतिशय सुंदर बंगला आहे. चार बेडरुमच्या या बंगल्यात सर्व सोयी-सुविधा आहेत. जिम, स्विमिंग पूल, स्पोर्ट्स रूम, लायब्ररी याशिवाय मिनी थिएटरही आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजयच्या या बंगल्याची किंमत जवळपास ३० कोटी आहे.

पति और बच्चों के साथ मुंबई की इस आलीशान घर में रहती हैं काजोल, देखे अंदर की  तस्वीरें

याशिवाय अजय देवगणचा मुंबईत एक आलिशान फ्लॅटही आहे. एवढेच नाही तर अजय-काजोलचा लंडनच्या पार्कलेनमध्ये एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत सुमारे ५५ कोटी आहे. घराव्यतिरिक्त अजयला लक्झरी कारचाही शौक आहे. सुमारे २ कोटी रुपयांची मैसेराटी क्वाट्रोपोर्टे कार खरेदी करणारा अजय पहिला भारतीय आहे. याशिवाय त्यांच्याकडे कोट्यवधींची अन्य वाहनेही आहेत.

Ajay Devgn And Kajol Sprawling Juhu Bungalow Inside Pictures - Inside  तस्वीरों में देखिए अजय और काजोल के आलीशान बंगले की खूबसूरती, घर में मौजूद  है पूल से लेकर थियेटर ...

अजय देवगणकडे कारशिवाय स्वतःचे खाजगी जेट देखील आहे. ६ सीटर जेटची किंमत सुमारे ८४ कोटी रुपये आहे. चित्रपटांमध्ये अभिनय आणि चित्रपटसृष्टीसोबतच अजय एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करतो. अजयचे करोडो चाहते आपल्याला पाहायला मिळतात आणि ते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात.

अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अभिनेत्याने नुकतेच त्याच्या आगामी ‘दृश्यम २’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. अजय या चित्रपटात श्रिया सरन, तब्बू आणि इशिता दत्तासोबत आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होताच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ‘दृश्यम २’ १८ नोव्हेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
..तर मग आज अजय देवगणच्या पत्नीचे नाव काजोल नसते, शोमू मुखर्जींनी ठरवलं होतं हे नाव
५१ व्या वर्षीही अविवाहीत का आहेस? तब्बू म्हणाली या अवस्थेला अजय देवगण आहे जबाबदार
अजय देवगण सोबत झळकलेल्या अभिनेत्रीवर आली भयंकर वाईट वेळ, चेहऱ्यातून काढल्या होत्या ६७ काचा
अजय देवगणच्या प्रेमात वेडी झाली कंगना; ब्रेकअप झाल्यावर म्हणाली, विवाहित पुरुषासोबत राहून चूक केली…

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now