ajay devgan visit kashi vishwanath temple | अजय देवगणचा ‘दृश्यम २’ हा चित्रपट सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता अजय देवगण वाराणसीमध्ये गेला होता.
यादरम्यान तो कधी अस्सी घाट तर कधी गंगेच्या लाटा पाहताना दिसला. निळ्या स्वेटर आणि काळ्या जीन्समधील अजय देवगणची ही खास स्टाइल चाहत्यांना खूप आवडली. अजय देवगणने वाराणसीतील काशी विश्वनाथ धाम गाठले आणि दर्शन आणि पूजाही केली.
यावेळी तो मंदिराच्या गर्भगृहात विधिवत पूजा करताना दिसून आला आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास बाबा विश्वनाथांची पूजा केल्यानंतर विश्वनाथ धामचे दर्शन घेतल्यानंतर तो मंदिरातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने गंगा द्वार येथून बोटीने बसून घाटांचे दर्शन घेतले.
वाराणसीला पोहचल्यानंतर अजय देवगण सर्वात आधी चेत सिंह घाटवरील शुटींग स्पॉटवर होता. त्यानंतर तो आजूबाजूच्या परिसरात गेला. दर्शन घेतल्यानंतर त्याने मीडियाशी सुद्धा संवाद साधला होता. मंदिरात आल्यानंतर तुला कसे वाटले असा प्रश्न विचारण्यात आला होता.
तो म्हणाला की, सगळ्यांना जसं आनंदी वाटतं तसंच वाटतंय. हर हर महादेव. त्यानंतर अजय देवगण काशी विश्वनाथच्या गंगाद्वारहून बोटीने परतला. अजय देवगणचे मंदिरातील काही फोटो सुद्धा व्हायरल झाले आहे. त्या फोटोंमध्ये त्याने कपाळावर चंदन लावलेला आणि हात जोडलेला दिसत आहे. अजयला पाहण्यासाठी तिथे खुप गर्दी जमली होती.
दरम्यान, अजय देवगणच्या दृश्यम २ ने नुकताच १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हैराण करणारी गोष्ट म्हणजे पहिल्यात आठवड्यात या चित्रपटाने ही कमाई केली आहे. दृश्यम २ हा एका मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे.
महत्वाच्या बातम्या-
झोपून खा नायतर लोळून! फक्त शेतीचा नाद पाहिजे; पठ्या वर्षाला कमावतो तब्बल दिड कोटी नफा; जाणून घ्या कसं?
rekha : मी सेक्ससाठी वेडी आहे…; प्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
Rohit Sharma : रोहित शर्मामुळे झाले ‘या’ स्टार खेळाडूचे करिअर उद्ध्वस्त? गंभीर आरोप करत म्हणाला…