आयकर विभागाकडून जालना जिल्ह्यात मोठा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. स्टील कारखानदार आणि व्यवसायिकांवर पडलेल्या या छाप्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या हाती तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती लागल्याची माहिती आहे. यावरून मराठवाड्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे दिसते. (income tax department raid from Jalana)
आयकर विभागाच्या या कारवाईबद्दल अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. त्यामुळे जालना जिल्ह्यात आयकर विभागाचे अधिकारी वेगवेगळ्या गाड्यांमधून दाखल झाले. अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या मुद्देमालात ५८ कोटी रुपये रोकड आणि ३२ किलो सोन्याचा समावेश आहे.
या कारवाई आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जालना जिल्ह्यातील चार बड्या स्टील कारखानदारांची झडती घेतली. एकाच वेळी आयकर विभागाची विविध पथकं स्टील उत्पादकांच्या विविध मालमत्तांवर छापे टाकत होती.
या कारवाईमध्ये अधिकाऱ्यांना सापडलेली रोकड मोजण्यासाठी तब्बल १२ मशीन वापरण्यात आल्या. तरी देखील ही रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना १४ तास लागले. यावरून मराठवाड्यातील ही कारवाई किती मोठी असेल याचा अंदाज येतो.
आयकर विभागाचे अधिकारी छाप्यांमध्ये सापडलेली रोकड जवळच्या एसबीआय बँक शाखेत नेऊन मोजत होते. बँकांमध्ये टेबलांवर ठिकठिकाणी नोटांच्या बंडलांची थप्पी रचलेली दिसत होती. १ ऑगस्ट रोजी सुरू झालेले हे छापेमारीचे सत्र ८ ऑगस्ट पर्यंत चालले होते.
जालना सारख्या छोट्याशा जिल्ह्यात स्टील व्यवसायिकांवर होणाऱ्या कारवाईमध्ये एवढे मोठे घबाड सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कारवाईमध्ये आयकर विभागाचे तब्बल देखील ३६० कर्मचारी सहभागी होते.
महत्वाच्या बातम्या-
मातोश्रीवर खलबतं? अजित पवारांसह राष्ट्रवादीचे बडे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला, चर्चेला उधाण
Sharad Pawar : शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला, म्हणाले, वादविवाद वाढविणे योग्य नाही, मी बाहेर पडल्यावर…
‘मुख्यमंत्री मला मोठी जबाबदारी देतील’; मंत्रिपद न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांची शहाजीबापू पाटलांनी घातली समजूत