Share

VIDEO: अजय देवगनचा राग पाहून घाबरले आनंद महिंद्रा, ट्विटमध्ये खुलासा करत म्हणाले..

Ajay Devgan

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Aanand Mahindra) त्यांच्या ट्विट्समुळे नेहमीच चर्चेत असतात. आताही ते एका ट्विटमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. नुकतीच सोमवारी त्यांनी एक ट्विट शेअर करत अजय देवगनमुळे (Ajay Devgan) त्यांना भीती वाटत असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर पोस्टमध्ये त्यांनी शहर सोडून जाणार असल्याचेही म्हटले आहे. आनंद महिंद्रा यांनी असे का म्हटले जाणून घेऊया.

अजय देवगन नुकतीच महिंद्राच्या एका जाहिरातीचे चित्रीकरण करण्यासाठी सेटवर पोहोचला होता. परंतु चित्रीकरणादरम्यान वारंवार जाहिरातीचे स्क्रिप्ट बदलण्यात येत असल्याने अजय देवगन संतापला. हाच व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

या व्हिडिओत अजय देवगन विचारताना दिसून येत आहे की, ‘बार-बार स्क्रिप्ट क्यों बदल रहे हो?’ तर यावर ‘बार बार नहीं सर.. बस चार बार’ असे प्रोडक्शन टीमकडून त्याला सांगण्यात येत आहे. त्यानंतर अजय देवगण नाराजीचा लूक देताना यामध्ये दिसत आहे.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘मला सांगण्यात आले की, महिंद्रा ‘ट्रक अॅन्ड बस’च्या जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान अजय देवगनला राग आला. त्यामुळे तो आमचाच एखादा ट्रक घेऊन माझ्या मागे येण्यापूर्वी मी शहर सोडून जाणं चांगलं आहे.

आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटवर यूजर्स अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. तर आता अजय देवगन यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, अजय देवगन महिंद्रा ट्रक अँड बसचा ब्रँड अॅम्बिसीडर आहे. काहीच दिवसांपूर्वी तो एका जाहिरातीत एक धमाकेदार स्टंट करताना दिसून आला होता. तर आता लवकरच तो नव्या जाहिरातीत नवीन स्टंट करताना दिसून येणार आहे.

अजय देवगनच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास लवकरच तो एस. एस. राजमौली यांच्या आरआरआर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसून येणार आहे. तसेच तो आलिया भट्टसोबत गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातही दिसणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
PHOTO: व्हॅलेंटाईन-डे च्या निमित्ताने विकी-कतरिनाने खास फोटो शेअर करत एकमेकांना दिल्या शुभेच्छा
विक्रांत मेस्सीने ‘या’ अभिनेत्रीसोबत गुपचूप लग्न करून चाहत्यांना दिला सुखद धक्का, पहा फोटो
एका भिकाऱ्याने रणधीर कपूर यांना दाखवली होती त्यांची जागा, त्यानंतर दिग्गज अभिनेता झाला होता नाराज

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now