सिनेसृष्टीत सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची चलती पाहायला मिळत आहे. ‘बाहुबली’, ‘केजीएफ’, ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ नंतर आता ‘केजीएफ २’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. एकीकडे दाक्षिणात्य चित्रपटांचा धबधबा वाढत असताना दुसरीकडे भाषेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. हा वाद दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपने (Kiccha Sudeep) दिलेल्या एका मुलाखतीनंतर सुरु झाला आहे.
किच्चा सुदीपने एका मुलाखतीदरम्यान बोलताना हिंदी भाषेबाबत वक्तव्य केले होते. त्याने म्हटले होते की, ‘पॅन इंडिया चित्रपट कन्नडमध्ये तयार होत आहेत. यामध्ये मी एक छोटीशी सुधारणा करू इच्छित आहे. हिंदी आता राष्ट्रीय भाषा राहिलेली नाही. आज बॉलिवूडमध्ये पॅन इंडिया चित्रपट तयार करण्यात येत आहेत’.
‘बॉलिवूडमध्ये तेलुगू आणि तमिळ चित्रपटांचे रिमेक करण्यात येत आहे. परंतु, तरीही तिथे संघर्ष सुरु आहे. आज आम्ही असे चित्रपट बनवत आहोत जे जगभर पाहिले जात आहेत’. सुदीपच्या या वक्तव्याची सर्वत्र खूप चर्चा झाली. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता अजय देवगनणे एक ट्विट करत सुदीपच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
अजय देवगने ट्विट करत लिहिले की, ‘किच्चा सुदीप, माझ्या भावा, जर तुझ्या मते हिंदी आपली राष्ट्रभाषा नसेल तर तुम्ही आपल्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी आपली मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषा होती, आहे आणि नेहमी राहणार. जन गण मन’.
अजयच्या या ट्विटनंतर सुदीपनेही काही ट्विट करत त्याचे स्पष्टीकरण दिले. सुदीपने म्हटले की, ‘सर मी ज्या अनुषंगाने ते वक्तव्य केलं होतं ते तुमच्यापर्यंत पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने पोहोचले आहे. पण मी तसं का म्हटलं हे मी तुमच्यासमोर तेव्हाच चांगल्या पद्धतीने मांडू शकेन जेव्हा मी तुम्हाला प्रत्यक्षात भेटू शकेन. माझ्या म्हणण्याचा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, उत्तेजित करणे किंवा कोणत्या वादाला प्रोत्साहित करण्याचा नव्हता. मी असे का करेन सर?’
https://twitter.com/KicchaSudeep/status/1519288948493000705?s=20&t=rb_INbzltEI9ZEQcgoLfVg
त्यानंतर सुदीपने दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी माझ्या देशातील प्रत्येक भाषेचा आदर करतो. मी या विषयाला अजून पुढे नेऊ इच्छित नाही. आणि हा विषय इथेच संपावा, असे इच्छितो. मी म्हटल्याप्रमाणे माझ्या म्हणण्याचा उद्देश पूर्णपणे वेगळा होता. खूप प्रेम आणि शुभेच्छा. आशा करतो की मी तुम्हाला लवकरच भेटेन’.
https://twitter.com/KicchaSudeep/status/1519288950879571969?s=20&t=I40ku7zjIYOblY-MsWrKeQ
यानंतर तिसऱ्या ट्विटमध्ये सुदीपने लिहिले की, ‘आणि अजय देवगन सर, तुम्ही जे हिंदीत संदेश पाठवलात ते मला लक्षात आलं. त्याचे कारण म्हणजे आम्ही सर्वजण हिंदी भाषेचा आदर करतो, त्यावर प्रेम करतो आणि त्यामुळेच आम्ही ही भाषा शिकली. काही हरकत नाही सर. पण मी विचार करत आहे की, जर मी हाच ट्विट कन्नड भाषेत पाठवला असता तर काय स्थिती असती? तेव्हा आम्ही सर्वजण भारतवासी नसतो का सर..?’
https://twitter.com/KicchaSudeep/status/1519292100126601218?s=20&t=ekbbFnLfMRZ9AOOAGYlJzQ
सुदीपच्या या ट्विटनंतर अजयनेही पुन्हा ट्विट करत त्याला प्रत्युत्तर दिले. अजयने लिहिले की, ‘हॅलो किच्चा सुदीप. तु माझा मित्र आहेस. माझी गैरसमजूत दूर करण्यासाठी तुझे आभार. मी सुरुवातीपासूनच सिनेसृष्टी एकच असल्याचे मानले आहे. आपण सर्वजण प्रत्येक भाषेचा आदर करतो आणि आशा करतो की, सर्वजण आपल्या भाषेचाही आदर करो. बहुशा, भाषांतरमध्ये काही हरवलं असेल’.
https://twitter.com/ajaydevgn/status/1519297004425613313?s=20&t=1xszGRkWhN2QC0QLhLj8CQ
अजयच्या या ट्विटवर सुदीपने पुन्हा उत्तर देत लिहिले की, भाषांतर आणि त्याचा अर्थ लावणे केवळ एक दृष्टीकोण आहेत सर. त्यामुळेच संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्याशिवाय प्रतिक्रिया करत नाहिये. अजय देवगन सर मी तुम्हाला दोष देत नाहिये. पण सर एखाद्या सर्जनशील कारणास्तव मला तुमच्याकडून ट्विट मिळाले असते तर कदाचित हा आनंदाचा क्षण ठरला असता. प्रेम आणि शुभेच्छा’.
https://twitter.com/KicchaSudeep/status/1519302436082520065?s=20&t=AMstGlZK2onHwwQF1In9Xg
महत्त्वाच्या बातम्या :
भररस्त्यात किन्नरांनी अडवून फोटो काढल्यानंतर अशी होती अदा शर्माची रिऍक्शन; पहा व्हिडीओ
‘महाराजांच्या सिनेमांना प्राईम शो मिळवण्यासाठी झगडावं लागतं’; चिन्मय मांडलेकरांनी व्यक्त केली खंत
KGF 2 ब्लॉकबस्टर होताच यश त्याच्या पत्नीसोबत झाला रोमॅंटिक, बीचवर घेतला पत्नीचा किस, पहा फोटो