बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या चित्रपटात अधिक काम करताना दिसत नाही, मात्र तरीदेखील चाहत्यांमध्ये तिच्याबद्दल असणारी क्रेझ कमी झालेली नाही. आजही ती जिथे कुठे जाते तिथे कॅमेरे आणि चाहते तिच्या मागे मागे धावतात. सध्या ऐश्वर्या राय चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, तिनं परिधान केलेली साडी आणि त्यासोबत दिलेला बोल्डनेसचा तडका.
एकेकाळी केवळ भारतातच नाही तर जगभरातील तरुण हे ऐश्वर्याच्या सौंदर्यासाठी वेडे झाले होते. अख्ख्या जगातील सर्वात सुदंर स्त्री म्हणून तिला मान मिळालेला आहे. ऐश्वर्याने ना कधी आपले वय लपवण्याचा प्रयत्न केला ना तिने वाढत्या वयासोबत आपली स्टाईल कमी होऊ दिली.
सध्या ऐश्वर्या राय चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, ऐश्वर्याचे पिंक साडीतील व्हायरल होणारे फोटो. हे फोटो 2004 चे आहेत. 2004 मध्ये ऐश्वर्या राय बच्चनने इंडियाचे बेस्ट फॅशन डिजाईनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्या पॉल यांच्यासाठी वॉक केले होते. फॅशन डिजाईनर सत्या पॉल यांच्यासाठी ती रॅम्प वर उत्तरली होती.
यावेळी, तिनं पिंक रंगाची साडी परिधान केली होती. तिचा लूक रेट्रो ट्रेंडहा हायलाईट करत होता आणि यात ऐश्वर्या कमालीची सुंदर दिसत होती. ह्या साडीचा पॅटर्न हाफ अँड हाफ लूक मध्ये ठेवला होता. ज्यात लाईट शेड्स सह डार्क रंगाचे कॉम्बिनेशन दिसते आहे. हे अटायर बनवण्यासाठी मुस्लिन स्लीकचा वापर केला होता.
यामुळे ऐश्वर्या यामध्ये अधिक खुलून आणि लाईटवेट लूक मध्ये दिसत होती. तिने परिधान केलेल्या साडीबद्दल सांगायचे झाल्यास, साडीच्या बॉर्डर पासून त्याच्या हेमलाइन पर्यंत पोल्का डॉट्स बनले होते. ज्यांना खूप जास्त फ्लॅशी किंवा ओव्हर द टॉप लूक दिला नव्हता. ही डिटेल सजवण्यासाठी सिक्वेन्स वर्कचा वापर केला होता.
सिक्वेन्स वर्कचा वापर केल्यामुळे तो साडीला मिनीमल एस्थेटिक टच देत होता. या साडीवर ऐश्वर्याने मॅचिंग ब्लाउज परिधान केला होता, जो पिंक रंगाचा होता. ब्लाउजला स्पार्कली-शाईनी आणि शिमरी फॅब्रिकमध्ये तयार केले होते. त्याला कटआउट स्लीव्हस दिली होती. त्यामुळे एकूणच ऐश्वर्याचे सौंदर्य यात खुलून दिसत होते.