माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. ऐश्वर्या लवकरच ‘पोन्नियन सेल्वन’ (Ponniyin Selvan) या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली असून चित्रपटातील ऐश्वर्याचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे. ऐश्वर्यानेही स्वतः तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिचा हा लूक शेअर केला आहे.
ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर ‘पोन्नियन सेल्वन’ चित्रपटातील तिचा लूक शेअर करत लिहिले की, ‘सुवर्णकाळ ३० सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे. ऐश्वर्याने शेअर केलेल्या फोटोत ती एखाद्या महाराणीसारखी दिसत आहे. ब्राऊन सिल्क साडी, गोल्डन ज्वेलरी यासोबत माथ्यावर मोठा टीळा अशा लूकमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक पाहून चित्रपटात तिची भूमिका खूपच दमदार असल्याचे वाटत आहे.
चित्रपटातील ऐश्वर्याची पहिली झलक प्रदर्शित करण्यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली आहे. यावर्षी ३० सप्टेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या बजेटबाबतही जोरदार चर्चा सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट ५०० कोटी रूपयांचा बिगबजेट चित्रपट असून यामध्ये ऐश्वर्या दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे.
याशिवाय हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग यावर्षी तर दुसरा भाग पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तमिळसोबत हा चित्रपट मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि हिंदीमध्येसुद्धा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम करत आहेत.
‘पोन्नियन सेल्वन’ हा चित्रपट एका तमिळ कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाचे कथानक दहाव्या शतकातील प्रमुख राजवंश चोल साम्राज्याशी संबंधित आहे. ऐश्वर्यासोबत या चित्रपटात विक्रम, जयम रवि, कार्थी, शोभिता धूलिपाला, त्रिशा यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या कलाकारांचेही चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आले आहे.
दरम्यान, ऐश्वर्या राय २०१८ साली ‘फन्ने खा’ या चित्रपटात शेवटची दिसली होती. त्यानंतर ती चित्रपटांपासून लांब राहिली. दीर्घकाळानंतर आता ती ‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण पुनरागमन करणार आहे. तर चाहते तिला पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
शाहरूखचा बहुचर्चित पठाण ‘या’ दिवशी होणार रिलीज, टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
त्याला मी रंगेहाथ पकडले होते तरी मी..; दीपिकाने सांगितला बॉयफ्रेंड रणबीरचा ‘तो’ किस्सा
करीना आणि काजोलच्या भररस्त्यातच सुरू झाल्या गप्पा; ‘या’ खाजगी मुद्यावर करत होत्या चर्चा