1993 च्या या तीन सेकंदाच्या व्हिडीओने ऐश्वर्या रातोरात झाली सुपरस्टार, तुम्ही पाहिला का तो व्हिडीओ?

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सौंदर्याची आज जगभरात चर्चा आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने ऐश्वर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मिस वर्ल्ड होण्यापूर्वी ऐश्वर्या मॉडेलिंग करत होती. तिचे मॉडेलिंग दिवसातील अनेक फोटो आणि व्हिडिओ वेळोवेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.(aishwarya-rai-came-into-limelight-overnight-because-of-this-three-second-video-from-1993)

दरम्यान, तिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर खूप चर्चेचा विषय ठरला आहे. जो 1994 मध्ये तिच्या ब्यूटी पीजेंटमध्ये सहभागी होण्यापूर्वीचा आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्यासोबत बॉलिवूडचे दोन स्टार्सही दिसत आहेत. ऐश्वर्या राय बच्चनचा(Aishwarya Rai Bachchan) व्हायरल व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. तिचा हा व्हिडिओ एका सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातीचा आहे.

या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत महिमा चौधरी(Mahima Chaudhary) आणि आमिर खान यांनीही काम केले आहे. या जाहिरातीत ऐश्वर्या अवघ्या 3 सेकंदासाठी दिसली. असे असूनही तिचा प्रेजेंस लोकांना चांगलाच आवडला होता. या जाहिरातीत तिचे नाव संजना होते. ऐश्वर्या रायची ही जाहिरात पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे.

जाहिरातीबद्दल बोलायचे झाले तर आमिर खान(Aamir Khan) त्याच्या घरी एकटा आहे. तितक्यात त्याच्या दारावरची बेल वाजते तो गेट उघडताच समोरून एक सुंदर शेजारी (महिमा चौधरी) येते आणि सॉफ्ट ड्रिंक मागते. दुसरीकडे, आमिर जेव्हा त्याचा फ्रीज पाहतो तेव्हा त्यात सॉफ्ट ड्रिंक नाही.

अशा वेळी शेजाऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी तो पावसात ट्रॅफिकची पर्वा न करता कोल्ड्रिंकची बॉटल घेऊन येतो, पण तेवढ्यात अचानक पुन्हा बेल वाजते. यावर महिमा चौधरी म्हणाली, संजू असावी आणि मग ऐश्वर्या येऊन म्हणते, हाय, मी संजना आहे, अजून पेप्सी आहे का? त्यानंतर आमिर पुन्हा एकदा तिच्यासाठी कोल्ड ड्रिंक आणण्याचा विचार करू लागतो.