बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांच्या अदाकारीचे चाहते दिवाणे आहेत. मोठ्या पडद्यावर आवडत्या अभिनेत्रीला पाहण्यासाठी चाहत्यांची नेहमी गर्दी असते. तसेच आवडत्या कलाकारांच्या खाजगी जीवनाबद्दल ही चाहत्यांना जाणून घेण्यात खूप रस असतो. यामध्ये अशा एका अभिनेत्रीचे नेहमी नाव येते जिच्या व्यवसायिक जीवनासोबतच खाजगी जीवन देखील नेहमी चर्चेत होते.
ती म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय. ऐश्वर्या राय ही नेहमी आपल्या खाजगी जीवनामुळे चर्चेत असते. यामध्ये सलमान खानसोबतचे तिचे अफेअर खूप चर्चेत आले होते. इतकेच नव्हे तर या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी सर्वात जास्त जोर धरला होता. माध्यमांच्या माहितीनुसार, ऐश्वर्या सलमानच्या पझेसिव्ह वागणुकीमुळे नाराज होती.
इतकेच नव्हे तर एका मुलाखतीत ऐश्वर्याने सलमानसोबतचं नातं ही सर्वात मोठी चूक असल्याचे सांगितले होते. तसेच तिने त्याच्यावर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोपही केला होता. तसेच सलमानने ऐश्वर्याचे शारीरिक शोषण आणि मारहाणीच्या बातमीने तेव्हा जोर धरला. जेव्हा ऐश्वर्या तिच्या जखमा लपवण्यासाठी चष्मा घालून एका अवॉर्ड फंक्शनला पोहोचली होती.
महत्वाचे म्हणजे यामागचे कारण ऐश्वर्याने वेगळेच सांगितले होते. ऐश्वर्याने सांगितले की, “ती जिन्यावरून पडली होती, त्यामुळे तिला ही दुखापत झाली होती.” मात्र, ऐश्वर्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, “सलमान तिचे शारीरिक शोषण करायचा. तिला कॉल करून काही चुकीचे बोलणे. तसेच सहकलाकारांमध्ये तिचे नाव जोडून तिला अपशब्द बोलणे.”
आपल्या सर्वांना माहितीच आहे की, सलमान आणि ऐश्वर्याची जवळीक ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या सेटवर वाढली. तसेच या दोघांचे जवळपास दोन वर्षाचे रिलेशनशिप होते. त्यांनतर त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर ऐश्वर्याचे नाव विवेक ओबेरॉयसोबत जोडले गेले. पण त्यानंतर तिने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. आता ती एका मुलीची आराध्याची आई झाली आहे.
तसेच ऐश्वर्या आणि सलमानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, या दोघांनी ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाव्यतिरिक्त ‘हम तुम्हारे है सनम’, ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. यातील तिन्ही चित्रपट खूप गाजले होते. मात्र त्यानंतर सलमान आणि ऐश्वर्या कधी ही एकत्र दिसले नाहीत.