रजनीकांत (Rajinikanth) यांची सून ऐश्वर्या (Aishwarya) आणि धनुष (Dhanush) यांनी लग्नाच्या 18 वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या बातमीने लोक हादरले. दोघांमध्ये असे काय घडले की लग्नाच्या 18 वर्षानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांचा हा निर्णय जाणून लोक नाराज झाले आहेत. पण मुलगी आणि जावयाच्या या निर्णयाने रजनीकांत चांगलेच नाराज झाल्याची बातमी आहे. (Aishwarya and Dhanush will get a divorce)
ऐश्वर्या आणि धनुष पुन्हा एकदा एकत्र यावेत अशी रजनीकांतची इच्छा असून त्यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. 17 जानेवारीला धनुष आणि ऐश्वर्याने एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही दुःखद माहिती दिली. धनुषचे वडील कस्तुरी राजा यांनी ऐश्वर्या आणि धनुषच्या या निर्णयाला ‘कौटुंबिक भांडण’ मानले. त्याचवेळी, सुपरस्टार रजनीकांत यांना मुलगी-जावईचं घर तुटल्याच्या बातमीने मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, एका सूत्राने माहिती दिली आहे की रजनीकांत यांच्यावर त्यांच्या मुलीच्या ब्रेकअपचा वाईट परिणाम झाला आहे. ऐश्वर्या आणि धनुषने आपले मतभेद दूर करून पुन्हा एकत्र यावे अशी रजनीकांतची इच्छा आहे. धनुष आणि ऐश्वर्यामध्ये भांडण होण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे बोलले जात आहे. दोघांमध्ये ‘कडवे मतभेद’ आहेत.
धनुष आणि ऐश्वर्याचे लग्न तुटण्याची वेळ याआधीही आली होती. याआधीही दोघांमध्ये अनेकवेळा मतभेद झाले होते, मात्र रजनीकांतने ते प्रत्येक वेळी हाताळले. त्यांनी दोघांमध्ये अनेकदा समेट घडवून आणला आहे. मात्र, ऐश्वर्या आणि धनुषच्या या निर्णयाबाबत रजनीकांत यांनी अद्याप कोणतेही जाहीर वक्तव्य केलेले नाही. दिग्गज अभिनेत्याला अखेरचे पोंगलला शुभेच्छा देताना पाहायले होते.
सर्वप्रथम हे जाणून घ्या की ऐश्वर्या एक चित्रपट दिग्दर्शक आणि पार्श्वगायिका आहे. ऐश्वर्यासोबत धनुषची पहिली भेट थिएटरमध्ये झाली होती. यानंतर धनुष आणि ऐश्वर्यामध्ये मैत्री झाली. धनुष आणि ऐश्वर्याचा विवाह 18 नोव्हेंबर 2004 रोजी कुटुंबीयांच्या संमतीने झाला. हे लग्न तमिळ रितीरिवाजानुसार पार पडले आणि दोघांनीही पारंपारिक लूक परिधान केला होता. या जोडप्याला यात्रा राजा आणि लिंग राजा ही दोन मुले आहेत, ज्यांचा जन्म 2006 आणि 2010 मध्ये झाला.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अतरंगी रेच्या यशानंतर धनुषला आनंद एल राय यांच्या होम बॅनर कलर यलोद्वारे निर्मित अॅक्शन लव्ह स्टोरीसाठी साइन करण्यात आले आहे. धनुष, जो आनंद एल रायचा आवडता आहे, तो या आगामी प्रोजेक्टमध्ये पूर्णपणे व्यावसायिक अवतारात दिसणार आहे. एवढेच नाही. सूत्राने पुढे सांगितले की, धनुषने आणखी एका प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊससोबत आणखी एक बिग बँग बॉलिवूड चित्रपट साइन केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुणेरी लाँड्रीवाल्याचा प्रामाणिकपणा! कपड्यात सापडलेले सहा लाखांचे दागिने केले परत, होतंय राज्यभरात कौतूक
नितेश राणे अखेर कोर्टात शरण; आता सोमवारी होणार सुनावणी, राणेंच्या वकिलांनी केले मोठे विधान, म्हणाले…
तीन जवानांनी विवाहित महिलेवर केला बलात्कार; अश्लील व्हिडिओ काढून दिली धमकी, नंतर झाले फरार
“मोदींकडे विमान खरेदी करण्यासाठी साडे आठ हजार कोटी आहे, पण विद्यार्थ्यांच्या निधीसाठी पैसे नाही”