मुंबई। बॉलिवूडमधील अनेक कपलची प्रेमकहाणी मजेदार आणि हटके आहे. अनेक कलाकारांनी लपून- छपून लग्न केले तर अनेकांनी आपले नाते जगासमोर सिद्ध केले. प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माने क्रिकेटर विराट कोहली बरोबर प्रेम विवाह करून संसार थाटला तर दुसरीकडे दीपिका आणि रणवीर देखील लग्नाच्या बंधनात अडकले. यांची प्रेमकहाणी तर आपल्या सर्वांना माहिती आहेच मात्र असे अनेक कलाकार आहेत ज्यांची प्रेमकहाणी कधी ऐकली नाही.
हि प्रेमकहाणी इतर कोणाची नसून आपली लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांची आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की ऐश्वर्या रॉय आणि बॉलिवूडचा दबंग सलमान खान हे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र काही कारणामुळे त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली आणि त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले.
सलमान खान सोबत झालेल्या ब्रेकअप नंतर देखील ऐश्वर्या थांबली नाही तिने सिनेसृष्टीत आपल्या सौंदर्याने आणि कलागुणांमुळे लाखो प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली. भारतातील सगळ्यात सुंदर स्त्री म्हणून ऐश्वर्याकडे पाहिले जाते. काही वर्षानंतर ऐश्वर्या रॉयने अभिनेता अभिषेक बच्चन यांच्याबरोबर लग्न केले.
२००७ साली अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ते दोघे विवाहबंधनात अडकले. मात्र या दोघांच लग्न झालं कसं? हे एकमेकांना कुठे भेटले यांची पहिली भेट कशी होती याबाबत अभिषेक बच्चनला प्रश्न विचारले असता त्याने या सगळ्या प्रश्नांचा खुलासा केला. तसेच त्यांच्या पहिल्या भेटीचा मजेदार किस्सा चाहत्यांना सांगितला.
अभिषेकने सांगितले, माझी आणि ऐश्वर्याची पहिली भेट हि स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. त्यावेळी मी शूटिंगचे लोकेशन पाहण्यासाठी स्वित्झर्लंडला गेलो होतो. तेव्हा तिथे माझा बालमित्र बॉबी देओल आणि ऐश्वर्या रॉय यांच्या फिल्मचे शूटिंग चालू होते. ‘और प्यार हो गया’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते तिथे आले होते.
मी स्वित्झर्लंडमध्ये आल्याची बातमी बॉबीला कळताच त्याने मला जेवायला बोलावले आणि त्याचवेळी मी ऐश्वर्याला पहिल्यांदा भेटलो. त्यानंतर त्यांच्यात बोलणं वाढत गेले, भेटी गाठी वाढू लागल्या. आणि त्यानंतर २००६ मध्ये ‘उमराव जान’ या फिल्मच्या शूटिंगदरम्यान ते दोघेही एकमेकांना डेट करू लागले.
एवढेच नाही तर २००६ मध्ये आलेल्या ‘गुरू’ चित्रपटाच्या प्रीमियरनंतर अभिषेकने न्यूयॉर्कमध्ये ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केले. त्यांचे नाते लग्नापर्यंत जाऊन पोहोचल्याने ते दोघे खूप खुश होते आणि त्याचवेळी ऐश्वर्याने देखील अभिषेकला लग्नासाठी होकार दिला. त्यानंतर २००७ साली अभिषेक आणि ऐश्वर्या लग्नाच्या बंधनात अडकले. हे दोघे आता अतिशय आनंदित असून त्यांना एक मुलगी आहे. तिचे नाव आराध्या आहे. आराध्या हि ऐश्वर्या इतकीच दिसायला सुंदर आहे.
भारतातील सगळ्यात सुंदर स्त्री म्हणून ऐश्वर्या रॉयकडे पहिले जाते. एवढेच नाही १९९४ मधील मिस वर्ल्ड स्पर्धेचा किताब देखील ऐश्वर्याने स्वतःच्या नावावर केला आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले असून हिंदी बरोबर तमिळ चित्रपटात देखील तिने आपली छाप सोडली आहे.
महत्वाच्या बातम्या:
सईला मिळाला लाईफ पार्टनर? ‘या’ व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाली, ‘साहेब दौलतराव सापडले’
मुंबईच्या संघात सगळ्यात घातक फलंदाजाची एन्ट्री, सलग दोन पराभवानंतर रोहितची मोठी खेळी
पेट्रोल डिझेलनंतर देशात सीएनजीचा भडका; 16 दिवसात ‘इतक्या’ रुपयांनी वाढला दर