Share

टाटांची दरियादिली! युक्रेनमधून भारतीयांना परत आणायला एअर इंडीयाने पाठवली विमानं

रशियाने केलेल्या आक्रणामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडिया विमान सज्ज झाले आहे. एअर इंडियाने शनिवारी आपली तीन विमाने बुखारेस्ट, हंगेरी आणि बुडारेस्टमध्ये पाठवली आहेत. याबाबतची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

त्यांनी सांगितले आहे की, युक्रेन-रोमानिया सीमेवर पोहोचलेल्या भारतीय नागरिकांना भारतीय सरकारी अधिकारी बुखारेस्टला घेऊन जातील जेणेकरुन त्यांना एअर इंडियाच्या विमानांद्वारे घरी आणता येईल. पुढे त्यांनी म्हटले आहे की, फ्लाइट क्रमांक AI1943 ने मुंबई विमानतळावरून पहाटे 3.40 वाजता उड्डाण केले आहे. त्यानुसार IST सकाळी 10 वाजता बुखारेस्ट विमानतळावर पोहोचणे अपेक्षित आहे.

मुख्य म्हणजे, एअर इंडियाने शुक्रवारी ट्विट करुन सांगितले आहे की, 26 फेब्रुवारी रोजी दिल्ली आणि मुंबई ते बुखारेस्ट आणि बुडापेस्टसाठी B787 विमान उडणार आहे. तसेच हिंमतीशी आमची मैत्री जुनी असल्याचा संदेश एअर इंडियाने दिला आहे. सध्या ज्या रस्त्यांच्या मार्गाने एअर इंडिया भारतीय प्रवाश्यांना मायदेशी आणणार आहे त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

गुरूवारी या युध्दाची स्थिती बघता युक्रेनियन अधिकाऱ्यांनी प्रवासी विमानांच्या संचालनासाठी त्यांच्या देशाची हवाई हद्द बंद केली आहे. त्यामुळे भारतीयांना घरी आणण्यासाठी बुखारेस्ट आणि बुडापेस्ट येथून एअर इंडियाची उड्डाणे चालवली जाणार आहेत. यामुळे कित्येक भारतीय मायदेशी परत येणार आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, सुमारे २०,००० भारतीय विद्यार्थी आणि नागरीक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना आणण्यासाठी भारतीय विमान गेल्यानंतर या सर्वांजवळ पासपोर्ट, रोख रक्कम, इतर आवश्यक वस्तू आणि कोविड लसीकरण प्रमाणपत्रे बॉर्डर चेक पोस्टवर सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान एअर इंडियाचे विमान भारतीयांना घेऊन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल मायदेशी परतणाऱ्या भारतीयांचे स्वागत करतील. यानंतर या सर्वांना आपापल्या घरी सुखरूप सोडवण्यात येईल. भारतीयांना सुखरुपपणे मायदेशी आणण्यामध्ये एअर इंडियाचा सर्वांत मोठा हात असेल.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now