Share

uddhav thackeray : उद्धव ठाकरेंवर अशीही निष्ठा, दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांचे परफेक्ट प्लॅनिंग; घेतला मोठा निर्णय

udhav

uddhav thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. सर्व शिवसैनिक आता आतुरतेने दसऱ्याची वाट पाहत आहेत. अनेकांनी सत्तांतर होताच उद्धव ठाकरेंची साथ सोडली. मात्र काही निष्ठावान अजूनही ठाकरेंच्या सोबत आहेत.

अशातच शिवसेनेच्या गोटात एक सकारात्मक बातमी येतं आहे. अहमदनगरच्या शिवसैनिकांनी मोठा निर्णय घेतला आहे. नगरमधील निष्ठावान शिवसैनिकांनी मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी पदयात्रेने जाण्याची ठरविले आहे. सोबतच नवरात्रीनिमित्त शिवसेनेकडून बये दार उघड ही मोहीम राबवली जाणार आहे.

तसं पाहायला गेलं तर, शिंदे गटाची हवा राज्यात अधिक असल्याच पाहायला मिळत आहे. मात्र असं असलं तरी देखील काही निष्ठावान अजूनही ठाकरेंच्या सोबत आहे. याचेच उत्तम उदाहरण आता दिसून आले आहे. नगरचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे व रावसाहेब खेवरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

खेवरे यांनी सांगितलं की, ‘शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी वाहनांतून जाण्यासोबतच नगरचे अनेक निष्ठावान शिवसैनिक पायी जाणार आहेत. ही नगर ते मुंबई पदयात्रा आजपासून सुरू होणार आहे. दसऱ्याच्या दिवशी ती मुंबईला पोहोचणार आहेत.’

दरम्यान, याबाबतच बोलताना नगरचे नगरसेवक योगीराज गाडे म्हणाले, ‘नवरात्रीत देवीवरील श्रद्धेपोटी भाविक देवीच्या दर्शनाला पायी जातात, अशी आपली परंपरा आहे. याचबरोबर आम्ही ठाकरे यांच्या शिवसेनेवरील श्रद्धेपोटी पायी जाणार आहोत, अशी माहिती गाडे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now