द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) रिलीज झाल्यापासून चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सतत चर्चेत आहेत. सिंगापूरमध्ये चित्रपटावर बंदी घातल्यापासून काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) आणि विवेक अग्निहोत्री यांच्यात वाद सुरू आहेत. या चित्रपटावर बंदी घातल्यानंतर शशी थरूर यांनी दिग्दर्शकाची खिल्ली उडवली, त्यामुळे दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले.( Agrihotri targeted Shashi Tharoor-Twinkle Khanna)
आता यासीन मलिकने दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याची कबुली दिल्यानंतर विवेकने अनेक नेत्यांसह सेलिब्रिटींना लक्ष्य केले आहे. शशी थरूर, अरविंद केजरीवाल आणि ट्विंकल खन्ना यांनी चित्रपटावर केलेल्या प्रतिक्रियांबद्दल त्यांनी खरपूस समाचार घेतला. तसंच आपल्या ट्विटमध्ये त्याला नरसंहाराला नकार असं म्हटलं आहे.
विवेक अग्निहोत्रीने ट्विट केले, ‘प्रिय नरसंहार नाकारणाऱ्यांनो, तुम्ही अजूनही या चित्रपटाचे वर्णन अर्धसत्य आणि इस्लामोफोबिक असे कराल का?’ आपल्या ट्विटमध्ये शशी थरूर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग करत त्यांनी विचारले की, तुम्ही यावर अजून हसाल का? याशिवाय अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिचे नाव न घेता त्याने विचारले की, तुम्हाला यापुढेही नेल फाइल्स नावाचा चित्रपट बनवायला आवडेल का?
Dear Genocide Deniers,
Still want to call it ISLAMOPHOBIC and half-truth?Dear @ShashiTharoor and @ArvindKejriwal,
Still feel like laughing?Dear star-wife,
Still wanna make nail-files?हम देखेंगे… https://t.co/MchtlEieft
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 10, 2022
दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, आज सर्व अत्याचारित लोकांसाठी खासकरून काश्मिरी हिंदूंसाठी ‘उत्सव दिन’ आहे. हत्याकांड नाकारणाऱ्या काँग्रेस, शहरी नक्षलवाद्यांसाठी आजचा दिवस शोकाकुल आहे. आज सत्य, न्याय आणि मानवतेचा विजय दिवस आहे. अशाप्रकारे विवेक अग्निहोत्रींनी ट्विट करून आपला आनंद व्यक्त केला आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ‘द कश्मीर फाइल्स’ला अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये सर्वात मोठे यश मिळाले आहे. केवळ १४ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. ताज्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत २५० कोटींची कमाई केली आहे. अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती यांसारख्या कलाकारांनी द काश्मीर फाईल्समध्ये काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
विवेक अग्निहोत्रींच्या दिल्ली फाईल्सवर भडकले शीख, म्हणाले, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर..
विवेक अग्निहोत्रींवर या कारणामुळे भडकले शीख लोकं, म्हणाले, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका
कोणत्या घटनेवर बनवणार द दिल्ली फाईल्स? चित्रपटात काय होणार? विवेक अग्निहोत्रींनी केला खुलासा
आता दिल्ली दंगलीची क्रुरता दाखवणार विवेक अग्निहोत्री? काश्मिर फाईल्सनंतर केली मोठी घोषणा