केंद्र सरकारने लष्करात भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) देशातील अनेक भागांतून विरोध होताना दिसत आहे. याचे पडसाद देशभरात उमटले आहे. मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह विविध राज्यांमध्ये शुक्रवारी हिंसक निदर्शने करण्यात आली.
अग्निपथ योजनेला विरोध म्हणून काल सिकंदराबाद येथे देखील आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. दामोदर राकेश (वय 21) असे मृत तरुणाचे नाव आहे. मुलाच्या मृत्यूने कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.
दामोदरच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. भावना व्यक्त करताना त्यांना अश्रु देखील अनावर झाले. सिकंदराबाद येथील आंदोलनादरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी 15 राऊंड फायर केले. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये 12 जण जखमी झाले.
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात राकेशला छातीत गोळी लागली. अन् यातच राकेशचा मृत्यू झाला. ‘आमचा मुलगा शत्रूच्या गोळ्यांचा बळी असता तर, आम्हाला अभिमान वाटला असता, पण आमच्याच पोलिसांच्या गोळीबारात तो मारला गेला याचं दुःख असल्याच राकेशच्या वडिलांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी म्हंटलं आहे की, ‘राकेशची बहीण सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहे, बहिणीप्रमाणे राकेशलाही सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा होती. स्वप्न पूर्ण करण्यासाठी राकेशने सैन्य भरतीची तयारी देखील करत होता. मात्र, आता राकेशचे स्वप्न अर्धवट राहिले.’
यावेळी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी(Student) वाहनांवर दगडफेक देखील केली आहे. याशिवाय देशभरात या योजनेला विरोध होत आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात देखील आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. कोंग्रेस थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
या योजनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘केंद्राला तीन कृषी कायद्यांसारखंच ही योजनाही मागे घ्यावी लागेल,’ असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
शिवसेनेमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर! एकनाथ शिंदे CM ठाकरेंवर नाराज, वाचा नेमकं काय घडलं?
सदाभाऊ खोतांनी राष्ट्रवादीवर केला खळबळजनक आरोप; म्हणाले, त्यांना माझ्यावर खुनी हल्ला करायचा होता
आठ वर्षांपासून काकूचे होते पुतण्यासोबत संबंध, पतीला कळल्यानंतर जे झालं त्यानं अख्खं गाव हादरलं
बिकीनी घालून वामिकाला सायकलवर फिरवताना दिसून आली अनुष्का शर्मा; लोक म्हणाले…