Share

Share Market : २ रुपयांच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला तब्बल १६ हजार टक्के परतावा

agi company share market return  | एजीआय ग्रीनपॅक या पॅकिंग मिडकॅप कंपनीच्या शेअरच्या किमतीत गेल्या २० वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांचे गुंतवणूकदार करोडपती झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सने २० वर्षांत १६ हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. २० वर्षांआधी या शेअरमध्ये जर कोणी एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याची किंमत दीड कोटींहून अधिक झाली असती.

ही कंपनी २.१३ हजार कोटी रुपयांची मार्केट कॅप असलेली मिड कॅप कंपनी आहे. जी इतर कंपन्यांची उत्पादने पॅक करते. ही कंपनी विशेषत: अशा कंपन्यांच्या उत्पादनांचे पॅकिंग करते. ही कंपनी बाटल्यांची विशेषत: वाईनची मोठ्या प्रमाणात पॅकींग करते.

२००२ साली शेअर बाजारात सूचिबद्ध झालेली ही कंपनी आतापर्यंतच्या दमदार कामगिरीमुळे मल्टीबॅगर बनली आहे. १८ ऑक्टोबर रोजी या कंपनीच्या शेअर्सची किंमत NSE वर १.६१ टक्क्यांनी वाढून ३३०.५० रुपये प्रति शेअर झाली. २० वर्षांपूर्वी जेव्हा त्याच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग सुरू झाली तेव्हा त्याची किंमत प्रति शेअर २.०२ रुपये होती.

अशा प्रकारे दोन दशकात या कंपनीच्या शेअरमध्ये १६,२६१ टक्क्यांनी जबरदस्त वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने २० वर्षांपूर्वी या कंपनीत १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे मूल्य १.६३ कोटी रुपये झाले असते. दीर्घ मुदतीसोबतच अल्पावधीतही कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त नफा दिला आहे.

गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये ९.२९ टक्क्यांनी घट झाली आहे, परंतु २०२२ मध्ये त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे दीड पटीने दुप्पट केले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये ४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर एका वर्षात ४४ टक्क्यांनी वाढ होत आहे.

कंपनीच्या शेअर्सची पाच वर्षांतील कामगिरी पाहिली, तर या कंपनीने १९२ टक्के मजबूत परतावा दिला आहे. यावेळी शेअरची किंमत ११३ रुपयांवरून ३३०.५० रुपयांपर्यंत वाढली आहे. याचा अर्थ असा की, जर एखाद्याने ५ वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याच्या स्टॉकची किंमत २.९२ लाख रुपयांवर पोहोचली असती.

महत्वाच्या बातम्या-
Jayant patil : ‘शिंदेगटात गेलेल्या आमदारांना पश्चाताप होतोय अन् ते आता परत शिवसेनेत यायचा विचार करत आहेत’
Sanjay Rathod : संजय राठोंडांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंचा मास्टर प्लॅन, ‘या’ माजी मंत्र्याला उतरवणार निवडणूकीच्या रिंगणात
Kangana Ranaut : आम्ही काय घालावं याच्याशी तुमचा काय संबंध? कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना कंगणाने फटकारले

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now