पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू ‘शाहिद आफ्रिदी’ने दहशतवादी फंडिंग प्रकरणात दोषी ठरलेला जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा फुटीरतावादी नेता यासिन मलिक याच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यानी यासिन मलिकचे समर्थन केले. यावर भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्राने आफ्रिदीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.(after-yasin-maliks-conviction-afridi-hurled-insults-amit-mishra-exposed-afridis-lie)
यासिन मलिकला दिल्लीतील विशेष न्यायालयाने टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याआधी, आफ्रिदीने(Shahid Afridi) ट्विटमध्ये लिहिले होते, काश्मीरमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना भारत ज्या प्रकारे गप्प करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचे कोणतेही समर्थन नाही.
https://twitter.com/SAfridiOfficial/status/1529357436733337600?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1529357436733337600%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.thequint.com%2Fnews%2Findia%2Fyasin-malik-life-imprisonment-kashmir-terror-funding-nia-reaction-amit-mishra-shahid-afridi-afridi-supports-yasin-malik-amit-takes-class
यासीन मलिकवरील(Yasin Malik) आरोपांमुळे काश्मीरचा स्वातंत्र्यलढा थांबणार नाही. मी युएनला विनंती करतो की, काश्मीरच्या नेत्यांवर सुरू असलेल्या बेकायदेशीर मार्गांची दखल घ्यावी. यानंतर मिश्राने आपल्या उत्तराने आफ्रिदीचे तोंड बंद केले. अमित मिश्राने लिहिले, प्रिय शाहिद आफ्रिदी! यासीन मलिकने कोर्टात गुन्हा कबूल केला आहे. तुझ्या जन्मतारखेसारखी प्रत्येक गोष्ट दिशाभूल करणारी असू शकत नाही.
अमित मिश्रा(Amit Mishra) यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आफ्रिदीने यापूर्वी अनेकदा काश्मीर मुद्द्यावर भडकावणारी विधाने केली आहेत आणि अनेकदा ट्विटही केले आहेत. यासिन मलिकला पाठिंबा दिल्याबद्दल काही भारतीय यूजर्सनीही शाहिद आफ्रिदीवरही टीका केली आहे.
मेघना गिरीश नावाच्या युजरने लिहिले की, ‘काही लोक होते जे पाकिस्तानसोबतच्या क्रीडा संबंधांना समर्थन देत होते, परंतु त्यांचा एक फेमस क्रिकेटपटू दोषी दहशतवाद्याचे समर्थन करत आहे, ज्याने भारतीय वायुसेनेच्या जवानांची हत्या करण्याचा आणि भारताविरुद्ध युद्ध करण्याचा दावा केला होता. यासीन मलिकला शिक्षा झाली पाहिजे.’
वान्या सिंह नावाच्या युजरने लिहिले, ‘देश बुडण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे, उपासमार होणार आहे, चीनच्या मदतीने अर्थव्यवस्था चालत आहे, IMF आणि इतर देशांकडून भीक मागत आहे. पण आफ्रिदीला त्याच्या देशापेक्षा दहशतवादी यासिन मलिकची जास्त काळजी आहे.’