Share

..तेव्हा वडिलांच्या पायांच्या मागे आम्ही लपून बसलो होतो, पाहिल्यानंतर अभिनेत्रीने सांगितल्या भयाण आठवणी

'The Kashmir Files'

काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित ‘द काश्मिर फाईल’ चित्रपट संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री संदिपा धरने देखील या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील भयाण वास्तवाच्या आठवणी इंस्टाग्रामवर पोस्ट करून शेअर केल्या आहेत.

संदिपा धर सुद्धा एक काश्मिरी पंडित असल्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर ही तर माझीच कहाणी असल्याचे तिने म्हणले आहे. संदिपाने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, “ज्या दिवशी काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून जाण्यास सांगितलं होतं, तेव्हा माझ्या कुटुंबानेही मातृभूमी सोडण्याचा निर्णय घेतला होता. एका ट्रकमध्ये माझ्या वडिलांच्या सीटच्या मागे, त्यांच्या पायांच्या मागे मी आणि माझी चुलत बहीण लपून बसलो होतो. मी काश्मीर फाइल्समध्ये ते अस्वस्थ करणारे दृश्य पाहिल्यानंतर माझं मन हेलावून गेलं.”

पुढे संदिपाने आपल्या दुःखद आठवणी शेअर करत म्हणले आहे की, “आपल्या घरी, आपल्या काश्मीरला परत जाण्याची वाट पाहत माझ्या आजीने प्राण सोडले. हा चित्रपट म्हणजे एक जोरदार मुक्का मारणारा आहे. चित्रपट पाहिल्यानंतर माझे पालक पीटीएसडी अनुभवत आहेत. ही सर्वात महत्वाची कथा आहे जी सांगण्यासाठी बराच वेळ लागला आणि लक्षात ठेवा हा तर केवळ चित्रपट आहे. आम्हाला अजूनही न्याय मिळाला नाही.”

यानंतर संदिपाने ‘द काश्मिर फाईल’ चित्रपट जगाला दाखविल्यामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. संदिपाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रचंड मोठया प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या संदिपाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. संदिपाची आपबिती ऐकून अनेकांनी तीला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान ‘द काश्मिर फाईल’ चित्रपट 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 90 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात अभिनेता अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.

या सर्वांच्या अभिनयासोबत चित्रपटाचे कौतुक संपूर्ण देशभरात होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यांनी यावेळी चित्रपट पाहण्याचे आवाहन संपूर्ण जनतेला केले आहे.

महत्वाच्या बातम्या
पुणे हादरलं! गेल्या चार वर्षांपासून वडील, भाऊ, आजोबा, मामा करत होते ११ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
काश्मीर फाईल्सची रेकॉर्डब्रेक कामगिरी, आमिर खानच्या दंगलला मागे टाकत बाहुबली २ ला दिली टक्कर
..आणि डोळ्यादेखत मामेबहिणीसह भावाचा धरणात बुडून मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना
संतापजनक! पती, मुलांसमोरच महिलेला निर्वस्त्र करुन गुंडांनी तिच्यावर केला सामूहिक बलात्कार

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now