बेल्जियममधील एका शहरात माजी विद्यार्थ्याने तब्बल तीन दशकांनंतर आपल्या शिक्षिकेची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. शाळेत केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी विद्यार्थ्याने हे पाऊल उचलल्याचे तपासातून समोर आले आहे. Gunter Uwents असे या आरोपी विद्यार्थ्याचे नाव आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शिक्षिका मारिया व्हर्लिंडेन यांनी १९९० मध्ये Gunter Uwents या विद्यार्थ्यांचा सर्वांसमोर अपमान केला होता. यावेळी Gunter Uwents फक्त सात वर्षांचा होता. तरी देखील मारिया यांनी केलेला अपमान Gunter कित्येक वर्षे उलटून गेली तरी विसरला नव्हता.
त्यामुळे त्याने २०२० मध्ये ५९ वर्षीय मारिया यांची त्यांच्या राहत्या घरी अत्यंत क्रूरपणे हत्या केली. Gunter ने चक्क १०१ वेळा मारिया यांच्यावर चाकूने वार केले. यानंतर तो तिथून फरार झाला होता. पोलिसांचा तपासानुसार, घरातले सर्व पैसे तसेच असल्यामुळे हा खून चोरीच्या हेतूने न झाल्याचे स्पष्ट झाले होते.
मात्र तरी देखील या खुनाचा शोध लावण्यास पोलिस अपयशी ठरत होते. शेवटी हत्येचे कित्येक वर्षे उलटून गेल्यानंतर Gunter ने आपल्या मित्राला आपण केलेल्या कृत्याची माहिती दिली. यावेळेस त्याने आता आपल्याला पश्चाताप वाटत असल्याचे देखील मित्राला बोलून दाखविले.
Gunter च्या मित्राला हे सर्व ऐकून धक्काच बसला. यामुळे त्याने ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार पोलिसांनी रविवारी Gunter ला अटक केली. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या डीएनए नमुन्यांची आणि आरोपीच्या नमुन्यांची तपासणी केली आहे. यातून Gunter मारियाच्या हत्येचा आरोपी असल्याचे सिद्ध झाले आहे.
दरम्यान Gunter ने देखील मारियाच्या हत्येची कबुली दिली आहे. मारियाने शाळेत असताना Gunter चा जो अपमान केला तो Gunter विसरू शकला नाही. यामुळेच त्यांने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांना सांगितले आहे. Gunter च्या अटकेनंतर या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
जनतेने आम्हाला १०५ जागा दिल्या, तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धेही निवडून आमदार आले नाहीत”
सापापेक्षाही भयानक विषारी आहे ‘हा’ किडा; तोंडात घेताच सापाचाही झाला क्षणात मृत्यू
होळीच्या शुभेच्छा देताना हिटमॅनला फुटला घाम, मुंबई इंडियन्सनेही म्हटलं ‘कॅप्टन, किस लाईन में आ गये आप’, पाहा मजेशीर व्हिडिओ
शाबास गं रणरागिणी! बैलगाडा जुंपणाऱ्या मुलीचे अमोल कोल्हेंनी केले कौतुक; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ