Share

विजयानंतर महाडीकांचा मुलगा वडीलांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागला; बापलेकाचं प्रेम पाहून सर्वच भावूक

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर अतिशय चुरशीची लढाई झाली. भाजपच्या धनंजय महाडिक यांनी विजय खेचून आणला. धनंजय महाडिक यांनी ४१.५६ मतं घेऊन शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. महाडिक यांच्या विजयानंतर महाडिक आणि त्यांच्या मुलाचा भावनिक क्षण पाहिला मिळाला.

धनंजय महाडिक यांनी ४१.५६ मते घेऊन शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. या विजयाने महाडिक कुटुंबातील पराभवाची मालिका एकप्रकारे खंडित झाली असेच म्हणावे लागेल. विजयानंतर देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते विधानसभेच्या पायऱ्यांवर जमा होते, यावेळी महाडिक यांच्या मुलाचे डोळे पाणावले.

महाडिक बाप लेकाचा भावनिक क्षण सर्वांना पाहायला मिळाला. धनंजय महाडिक यांचा विजय होताच त्यांच्या लेकाला विधानभवनाच्या पायऱ्यांवर भावना अनावर झाल्या. लेकाला पाहून महाडिक यांनी मुलाची गळाभेट केली. त्याची समजूत काढली. त्या दोघांना पाहून काही वेळासाठी इतर उपस्थित असणारे कार्यकर्ते देखील भावनिक झाले.

दरम्यान, विजयानंतर देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, आमचे माननीय पियुष गोयल हे ४८मतं घेऊन पहिल्या क्रमांकाने निवडून आले आहेत. तेवढीच मतं आमच्या डॉ. बोंडे यांना मिळाली. ते देखील पहिल्या क्रमांकावर निवडून आले. त्यांना ४८मतं मिळाली आहेत.

तसेच म्हणाले, धनंजय महाडिक यांना ४१.५६ मतं मिळाली, जी संजय राऊत यांच्यापेक्षा अधिक आहेत. शिवसेनेचं जे मत बाद झालं, ते मत ग्राह्य धरलं असतं तरी आमचा विजय झाला असता, हे देखील फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्यातील आमदार मुक्ता टिळक यांचे विशेष आभार मानले.

लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची प्रकृती चांगली नसून देखील दोघे मतं देण्यासाठी आले याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच आघाडीवर टीका करताना म्हणाले, आजचा विजय सर्वार्थाने महत्त्वाचा विजय आहे. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला बहुमत दिलं होतं. पण ते बहुमत आमच्या पाठीत खंजीर खुपसून काढून घेण्यात आलं आणि अशाप्रकारचं सरकार हे किती अंतर्विरोधाने भरलं जातं हे आपल्याला आजच्या विजयानंतर पाहायला मिळालं.

राजकारण

Join WhatsApp

Join Now