Share

‘पावनखिंड’च्या यशानंतर दिग्पाल लांजेकर घेऊन येणार ‘हा’ ऐतिहासिक चित्रपट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

सध्या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘पावनखिंड’ याची घोडदौड सुरू आहे. हा चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे.18 फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हापासून त्याने चांगला गल्ला कमावला आहे. अशातच आता, लवकरच दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकरांचाच ‘शेर शिवराज’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पावनखिंड नंतर आता ‘शेर शिवराज’ हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. शिवराज अष्टक फिल्म सीरिज ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या जीवनावर आधारित असलेली आठ सिनेमांची सीरिज आहे.

त्यातले फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड प्रदर्शित झाले आहेत. लवकरच ‘शेर शिवराज’ सिनेमादेखील प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षी 24 डिसेंबरला या चित्रपटाची घोषणा केली होती. शिवाय चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली होती. या चित्रपटात देखील चिन्मय मांडलेकर शिवाजी महाराजांची भूमिका करताना दिसणार आहेत.

सध्या ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदविला गेला आहे. पहिल्याच दिवशी 1530 शोजसह ‘पावनखिंड’ चित्रपटगृहात दाखल झाला होता. सध्या या चित्रपटाने 10 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.  ‘पावनखिंड’ ची पहिल्या आठवड्याची कमाई ही जवळपास 10.97 कोटी रुपये इतकी झाली आहे.

पावनखिंड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर, बाजीप्रभूंच्या भूमिकेत अजय पुरकर यांनी लाजवाब कामगिरी केली आहे. अजय यांनी भूमिकेसाठी घेतलेली शारीरिक मेहनत पडद्यावर विशेष दिसते. अभिनयातील संयम आणि व्यक्तिरेखेतील बारकावे त्यांनी पकडले आहेत.

या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, सुरभी भावे, माधवी निमकर, दिप्ती केतकर, प्राजक्ता माळी, वैभव मांगले, हरीश दुधाडे, विक्रम गायकवाड, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आदी कलाकारांसोबतच संतोष जुवेकरनं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now