श्रेयस तळपदेचा (Shreyas Talpade) ‘कौन प्रवीण तांबे’ (Kaun Pravin Tambe?) हा नवीन चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांचे कौतुक मिळत आहे. या चित्रपटात श्रेयस क्रिकेटपटू प्रवीण तांबेच्या भूमिकेत दिसत आहे. श्रेयस पडद्यावर क्रिकेटर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याचा पहिला चित्रपट ‘इकबाल’ ही सुद्धा क्रिकेटभोवती रचलेली कथा होती, ज्याने श्रेयस तळपदेला रातोरात स्टार बनवले होते.(after-the-success-of-kaun-pravin-tambe-shreyas-revealed)
‘इकबाल’ नंतर श्रेयस त्याच्या नवीन चित्रपटात पुन्हा क्रिकेट खेळताना दिसणार आहे, पण हा चित्रपट त्याच्यासाठी खूप वेगळा आहे. श्रेयसने एका वृत्तसंस्थेशी केलेल्या खास संवादात सांगितले की, त्याच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर जेव्हा सर्व काही फारसे चांगले नाही आणि अनेकांच अस म्हणण आहे की ‘त्याचा चित्रपट प्रवास फक्त इथंपर्यंतच आहे’, अशा परिस्थितीत ‘कौन प्रवीण तांबे’ चित्रपट त्याच्यासाठी एक लक्ष्य आहे. श्रेयसने असेही सांगितले की लोक म्हणू लागले होते की ‘पुढे गोलमाल चित्रपट आला तर त्याला काम मिळेल नाहीतर तो काय करणार? वगैरे वगैरे…’
श्रेयस तळपदेचा ‘कौन प्रवीण तांबे’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. ‘कौन प्रवीण तांबे’ आणि ‘इकबाल’च्या तयारीतील फरकाबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, ‘इकबाल ही एक काल्पनिक कथा होती तर कौन प्रवीण तांबे ही सत्यकथा आहे. ज्यावेळी मी इकबाल केला तेव्हा माझ्यावर जास्त टेन्शन नव्हते. मी एक नवीन माणूस होतो, मला फक्त स्वतःला सिद्ध करायचे होते, चांगले करायचे होते. तसं झालं आणि माझं करिअर सुरू झालं.
श्रेयस पुढे म्हणतो, ‘पण आता अशी वेळ आली आहे, जेव्हा माझे करिअर फारसे चांगले जात नाही. बर्याच जणांनी मला बेकार समजले आहे त्यांना वाटते की संपल आता याच करियर किंवा जर गोलमाल आला तरच याला संधी मिळेल… नाहीतर हा काय करणार’. वगैरे वगैरे…. त्यामुळे अशा परिस्थितीत या गोष्टींकडे लक्ष न देता मी माझे लक्ष केंद्रित करणे आणि चांगले काम करणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे.
‘कौन प्रवीण तांबे’ करताना माझ्यावर सर्वात मोठी जबाबदारी आली की, मी ज्याची कथा दाखवतोय त्याच्या अपेक्षा पूर्ण करणे. त्याची कथा सांगण्याची जबाबदारी तो माझ्यावर देत आहे, अशा परिस्थितीत मी ती कथा योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. तो आणि त्याच्या कुटुंबीयांनी ही कथा पाहिल्यावर त्यांना अभिमान वाटावा, असा माझा प्रयत्न होता.
श्रेयस म्हणाला, इकबालच्या काळातही मी खूप सराव केला होता. पण जेव्हा तुम्ही एखादा सामना खेळता तेव्हा तुम्ही तो खेळासारखा खेळता आणि तो काही काळानंतर संपतो. पण शूटिंगचे तसे नसते. तुम्ही तेच काम पुन्हा पुन्हा करता. मला आठवते मी 10-10 ओव्हर्स एकत्र करायचो. मी ‘कौन प्रवीण तांबे’ची तयारी सुरू केली तेव्हा माझ्या त्या अनुभवाचा मला खूप फायदा झाला. ‘इकबाल’च्या वेळी मी 30 वर्षांचा होतो, आता मी 45 वर्षांचा आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचीही काळजी घ्यावी लागली. माझा स्टॅमिना कसा टिकवायचा यावर मला लक्ष केंद्रित करायचे होते.
क्रिकेटर प्रवीण तांबे याने त्याच्या आयपीएल टीम केकेआरसोबत या चित्रपटाची स्क्रीनिंग केली आणि त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. या स्क्रिनिंगमध्ये प्रवीण हा चित्रपट पाहून खूप भावूक झालेला दिसला. श्रेयस तळपदेने सांगितले की, स्क्रिनिंगनंतर प्रवीणने त्याला मेसेज केला, ‘तुम्ही चित्रपटात शानदार होता.’ अभिनेता म्हणाला, ‘त्याची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.’
‘कौन प्रवीण तांबे’ ही क्रिकेटपटू प्रवीण तांबेची कथा आहे, ज्याने वयाच्या 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. क्रिकेटमध्ये या वयात खेळाडूंच्या निवृत्तीची अनेकदा चर्चा होते, मात्र या वयात प्रवीण तांबे यांच्या पदार्पणाची कहाणी संघर्षांनी भरलेली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे प्रशिक्षक आणि भारतीय क्रिकेटची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडला 2014 साली एका कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले होते. जिथे तो म्हणाला, ‘लोकांची अपेक्षा असते की मी तुमच्याशी सचिन, गांगुली किंवा कुंबळेबद्दल बोलेन. पण मला प्रवीण तांबे यांच्याबद्दल सांगायचे आहे. प्रवीणने जवळपास 20 वर्षे मुंबईतील वेगवेगळ्या मैदानात क्रिकेट खेळले, पण मुंबईचे प्रतिनिधित्वही करू शकला नाही.
महत्वाच्या बातम्या-
श्रेयस तळपदेपासून ते मुक्ता बर्वेपर्यंत, हे आहेत छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त मानधन घेणारे कलाकार
कौन प्रवीण तांबे? चा ट्रेलर शेअर करत श्रेयस तळपदे म्हणाला, काय स्टोरी आहे
VIDEO: श्रेयस तळपदेची एअरपोर्टवर धाकड एन्ट्री; म्हणाला, पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या?
कौन प्रवीण तांबे? चा ट्रेलर झाला प्रदर्शित; श्रेयस तळपदे दिसला नव्या भूमिकेत, पहा व्हिडीओ