बॉलिवूडची क्यूट जोडी म्हणून अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कॅटरीना कैफ यांना ओळखले जाते. या लव्ह बर्ड्सनी मागच्या महिन्यात गुपचूप लग्न केले होते. राजस्थानमध्ये लग्न झाल्यानंतर यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. या दोघांच्या लग्नाला ९ जानेवारीला एक महिना पूर्ण झालेला आहे. लग्नानंतर काही दिवसातच विक्की हा कामावर परतला आहे.
सध्या तो इंदोरमध्ये आगामी चित्रपटाची शूटिंग करत आहे. त्यामुळे पत्नी कॅटरीना देखील त्याच्यासोबत इंदोरमध्ये वेळ घालवत आहे. आगामी चित्रपटाची शूटिंग करण्यात विक्की दिवसभर व्यस्त असतो. मात्र त्यानंतर संध्याकाळचा वेळ हा पत्नीसाठी तो देत आहे. त्याचीच एक झलक विक्कीने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. लग्नानंतर कॅटरिना विक्कीची पूर्ण काळजी घेत आहे.
विक्की कौशलने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो विकीच्या बेडरूममधला आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की, खाद्यपदार्थ तीन प्लेटमध्ये ठेवले आहेत आणि एक पेय देखील ठेवले आहे. तसेच हॉलिवूड चित्रपट देखील टीव्हीवर चालू आहे. हा फोटो शेअर करत विक्कीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पोस्ट पॅकअप पॅम्पर!’ हा फोटो विक्की कौशलने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
या फोटोवरून असे स्पष्ट दिसून येत आहे की, पत्नी कॅटरिना ही पती विक्कीची चांगली काळजी घेत आहे. अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि विक्की कौशल यांचे ९ डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थान येथे लग्न झाले. त्यामुळे या दोघांची ही लग्नानंतरची पहिली लोहडी होती. जी दोघांनी ही एकत्र इंदोरमध्ये साजरी केली. याच दरम्यानचा एक क्यूट फोटोही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दोघेही खूप आनंदी आणि रोमँटिक अंदाजात एकत्र दिसले होते.
हा फोटो विक्कीने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. फोटोमध्ये कॅटरीना लाल रंगाचा सलवार-कुर्ता घातलेली दिसून येत आहे. या लाल ड्रेसमध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. याचबरोबर तिने सूटसोबत ब्लॅक लेदर जॅकेटही घातले होते. तर दुसरीकडे, विक्की टी-शर्ट ट्रॅकपेंट आणि जॅकेटमध्ये कॅज्युअल लूकमध्ये दिसला होता.
मागच्या महिन्यात विक्की आणि कॅटरीनाचे लग्न हे शाही पद्धतीने झाले. या लग्नात मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रण दिले होते. त्याचबरोबर लग्नाची माहिती आणि फोटो बाहेर जाणार नाही याची पूर्ण काळजी घेतली होती. त्याचबरोबर जेव्हा लग्नाचे फोटो व्हायरल झाले तेव्हा विक्की आणि कॅटरीना दोघेही खूप आनंदात दिसून आले.