रीवा जिल्ह्यातील त्योंथर येथे प्राणी प्रेमाचे अनोखे प्रकरण समोर आले आहे. विजेचा करंट लागून एका माकडाचा मृत्यू झाला होता. यावर स्थानिक लोकांनी आनंदाने त्यांची शेवटची यात्रा तर काढलीच पण त्याला आदराने दफनही करण्यात आले. एका माकडाप्रति दाखवलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.(Current, funeral The death of the monkey)
https://twitter.com/Anurag_Dwary/status/1529712057930911744?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1529712057930911744%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Findia%2Fvideo-people-performed-the-last-rites-of-the-monkey-in-madhya-pradesh-3010978
हे प्रकरण त्योंथरच्या चाकघाट येथील वॉर्ड क्रमांक १२चे आहे. येथे एका माकडाचा करंट लागून मृत्यू झाला होता. सर्वप्रथम तेथील व्यापाऱ्यांनी वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाने सांगितले की, माकडाचे शव वाहून नेण्याची जबाबदारी पालिकेची आहे. यामध्ये वनविभाग त्यांची कोणतीही मदत करू शकत नाही.
त्यानंतर लोकांकडून पालिकेला कळवण्यात आले. जे काही करेल ते वनविभाग करेल, असे पालिकेकडून सांगण्यात आले. दोन्ही विभाग जबाबदारी घेण्यापासून टाळाटाळ करत असताना स्थानिक लोकांनीच त्या माकडाचा अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. अंत्यसंस्कार पूर्ण आदराने करायचे असे त्यांनी ठरवले.
त्योंथरच्या लोकांनी माकडाला अंघोळ घातली, सगळी तयारी झाली. संगीताची व्यवस्था करण्यात आली होती. ताशाच्या गाज्या-वाज्यात लोकांनी आनंदाने शेवटची यात्रा काढली. त्या माकडाला श्रद्धांजली वाहण्यात आली. महेंद्र केसरवाणी, बडकू आदिवासी यांच्यासह अनेकांनी माकडाच्या अखेरच्या प्रवासात सहभाग घेतला.
केसरवाणी म्हणाले की, आम्ही चाकघाट येथील वनविभागाला माकडाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती, मात्र तिथून मदत मिळाली नाही. मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांनीही रस घेतला नाही. त्यानंतर आम्ही माकडाचे अंतिम संस्कार केले.
महत्वाच्या बातम्या-
शिवकुमार शर्मांच्या अंत्यसंस्काराला ढसाढसा रडताना दिसले झाकीर हुसैन, संपूर्ण देश झाला भावूक
काल ज्याच्यावर अंत्यसंस्कार झाले, तो आज जिवंत घर परतला; घटनेची परिसरात चर्चा
..अन् वडिलांच्या अंत्यसंस्कारातच ७ मुलांमध्ये झाली हाणामारी, पोलिसांच्या उपस्थितीत झाले अंत्यसंस्कार
या कारणामुळे अभिनेते राजकुमार यांच्यावर गुप्तपणे अंत्यसंस्कार करण्यात आले होते