Virat Kohli : टी-२० विश्वचषक २०२२ चा भारत आणि बांगलादेशविरुद्ध रोमांचक सामना पार पडला. यात भारताने ५ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आता भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. किंग कोहली हा मैदानावर जितका आक्रमक दिसतो तितकाच मैदानाबाहेर तो आपल्या मनमिळावू स्वभावाने लोकांच्या मनावर राज्य करतो.
नुकतेच त्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर याचे आणखी एक उदाहरण दिले आहे. भारताविरुद्ध ६० धावांची धडाकेबाज खेळी करणाऱ्या लिटन दासला सामन्यानंतर कोहलीने आपली बॅट भेट दिली आहे. या खास भेटीमुळे लिटन दासचे मनोबल नक्कीच वाढले असेल.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना लिटल दासने आपल्या संघाला झंझावाती सुरुवात करून दिली आणि अवघ्या २१ चेंडूत अर्धशतक झळकावले.
पाऊस येण्याआधी बांगलादेश सामन्यात टिकून होता, पण केएल राहुलने लिटन दासला शानदार रनआऊट केल्यानंतर हा सामना भारताच्या दिशेने झुकला. त्यामुळे बांगलादेशला हा सामना गमवावा लागला. टीम इंडियाने हा सामना ५ धावांच्या फरकाने जिंकला.
बांगलादेश क्रिकेट बोर्डचे (BCB) अध्यक्ष जलाल युनूस यांनी लिटन दासला बॅट भेट दिल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, सामना संपल्यानंतर कोहली ड्रेसिंग रूममध्ये आला आणि त्याने लिटन दासला ही खास भेट दिली.
बीडीक्रिकटाईम बांगलानुसार, जलाल युनूस म्हणाले की, “आम्ही डायनिंग हॉलमध्ये बसलो असताना विराट कोहली आला आणि त्याने लिटनला बॅट भेट दिली. लिटनसाठी ही खूप मोठी प्रेरणा आहे असे मला वाटते,”असेही ते म्हणाले.
या सामन्यात विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध ६४ धावांची नाबाद खेळी खेळली होती. या खेळीच्या जोरावर तो २०२२ च्या टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. या स्पर्धेत कोहलीच्या नावावर आता २२० धावा आहेत. तो आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांमध्ये एकदा बाद झाला आहे आणि उर्वरित तीन वेळा त्याने नाबाद अर्धशतके झळकावली आहेत.
महत्वाच्या बातम्या
India : पाकिस्तानने हरवलं आफ्रिकेला पण वाट लागली भारताची; वर्ल्डकपमधून भारत बाहेर?
IND vs PAK : ..तर वर्ल्डकप फायनलमध्ये होणार भारत विरूद्ध पाकिस्तानचा सामना, जाणून घ्या संपुर्ण गणित
Pakistan : ‘वर्ल्कपमध्ये बड्या बड्या संघांना जे जमलं नाही, तो पराक्रम पाकिस्तानी संघाने करुन दाखवला’
Indian Team : पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेंशन वाढलं, सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी उरलाय फक्त ‘हा’ एकमेव मार्ग