Share

Aamir Khan: चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिरला धक्क्यावर धक्के, आता Netflix सोबतची ‘ही’ डीलही झाली कॅन्सल

Aamir Khan, Lal Singh Chadha Netflix, Contract/ आमिर खानच्या (Aamir Khan) लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपट फ्लॉप ठरल्याने आता त्याचे ओटीटी रिलीजही रद्द करण्यात आले आहे. नेटफ्लिक्सने आपला करार रद्द केल्याचे बोलले जात आहे. ही बातमी समोर येताच आमिरचा चित्रपट फ्लॉप झाल्याने त्याला एकापाठोपाठ एक धक्के बसत असल्याचे बोलले जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच आमिरने नेटफ्लिक्सला OTT वर प्रदर्शित करण्यासाठी डिजिटल अधिकार विकण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली होती. अहवालांवर विश्वास ठेवला तर त्याने 150 कोटींहून अधिक रुपयांची मागणी केली होती. मात्र आता चित्रपट फ्लॉप होताच त्यांचा व्यवहार फिसकटला आहे, त्यामुळे आमिरला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खानने एक अट ठेवली होती की, लाल सिंह चड्ढाला रिलीजच्या 6 महिन्यांनंतर ओटीटीवर दाखवला जाईल. तथापि, नेटफ्लिक्सने आमिरला अनेक वेळा अंतर कमी करण्याची मागणी केली होती. त्याच्यासोबत अनेक बैठका झाल्या मात्र, आमिर यासाठी तयार नव्हता.

यानंतर, जेव्हा चित्रपटाच्या डिजिटल अधिकारांचा प्रश्न आला तेव्हा आमिरने जवळपास 150 कोटींची मागणी केली. याबाबत नेटफ्लिक्स आणि आमिरमध्ये बरीच चर्चाही झाली होती. नेटफ्लिक्स चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी 80 ते 90 कोटी रुपये देणार असल्याची चर्चा होती, मात्र आमिर त्यासाठी तयार नव्हता. बराच विचारविनिमय केल्यानंतर अखेर नेटफ्लिक्सने त्याला 50 कोटी रुपयांची डील दिली. मात्र आमिरला हे मान्य नव्हते आणि तो 125 कोटींची मागणी करू लागला.

लाल सिंह चड्ढा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपयांपर्यंतचा व्यवसाय करेल, असे त्याला वाटत होते, पण फासे उलटे पडले. बॉक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॉप ठरला. 180 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट रिलीजच्या 11 दिवसांतही खर्च वसूल करू शकला नाही.

आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचा बॉयकॉटवर वाईट परिणाम झाला होता. रिलीजपूर्वीच सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू झाला. याशिवाय अक्षय कुमारचा रक्षाबंधन हा चित्रपटही या चित्रपटासोबत प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपटांच्या क्लॅशमुळे व्यवसायात फरक पडला होता.

महत्वाच्या बातम्या-
Lal Singh Chadha earnings : लालसिंग चड्ढाला वाचवण्यासाठी आमिर खानकडे उरला हा एकच पर्याय, निघू शकतो पुर्ण खर्च
Gippy Grewal : आमिर खानच्या या आग्रहामुळे लाल सिंग चड्ढा झाला फ्लॉप? धक्कादायक कारण आले समोर
Aamir khan : लाल सिंग चड्ढा सुपरफ्लॉप गेल्यामुळे आमिर खानला बसला मोठा धक्का, घेतला मोठा निर्णय
Lal Singh Chadha earnings : लालसिंग चड्ढाला वाचवण्यासाठी आमिर खानकडे उरला ‘हा’ एकच पर्याय, निघू शकतो पुर्ण खर्च

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now