Share

चेन्नईच्या पराभवानंतर BCCI वर संतापला वीरेंद्र सेहवाग, म्हणाला, लाईट गेली होती तर…

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ मध्ये, गुरुवारी मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात सामना झाला. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा सामना वीज खंडित आणि तांत्रिक समस्येमुळे चर्चेत होता. गुरुवारी झालेल्या या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचे चाहते प्रचंड नाराज झाले आहे.(After the defeat of Chennai, Virender Sehwag got angry at BCCI)

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यात चेन्नईच्या पराभवासाठी डीआरएस सर्वाधिक जबाबदार असल्याचे मानले जात आहे. सामन्यापूर्वी काही काळ डीआरएस उपलब्ध नव्हता. वीज नसल्यामुळे संपूर्ण यंत्रणा बंद पडली होती आणि त्याचवेळी डेव्हॉन कॉनवे वादग्रस्तपणे एलबीडब्ल्यू बाद झाला आणि चेन्नईचा संघ डीआरएस घेऊ शकला नाही. यावर वीरेंद्र सेहवागने संपूर्ण यंत्रणेवर टीका केली.

डीआरएससाठी जनरेटरचा वापर होत नसल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. वीज गेल्यामुळे डीआरएस उपलब्ध नव्हते हे आश्चर्यकारक होते. ही इतकी मोठी लीग आहे की जनरेटर वापरला जाऊ शकतो. सॉफ्टवेअर कोणतेही असो, ते बॅकअपद्वारे विजेवर चालवता येत असते. हा मोठा प्रश्न बीसीसीआयसमोर आहे.

वीरेंद्र सेहवाग एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, वीज कापली तर? जनरेटर फक्त स्टेडियमच्या प्रकाशासाठीच आहे का ब्रॉडकास्टर आणि त्यांच्या सिस्टमसाठी नाही का? सामना होत असेल तर डीआरएस वापरायला हवा होता किंवा डीआरएसचा वापर संपूर्ण सामन्यात करायला नव्हता पाहिजे. मुंबईने प्रथम फलंदाजी केली असती तर त्यांचा पराभव झाला असता.

विशेष म्हणजे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्स (३/१६) याने चेन्नईला पराभवाच्या उंबरठ्यावर आणण्यात जितकी महत्त्वाची भूमिका बजावली, तितकीच महत्त्वाची भूमिका पॉवरकटनेही बजावली. मैदानावरील पॉवरकटमुळे डीआरएस सुविधा उपलब्ध नव्हती आणि चेन्नईच्या फलंदाजांना पहिल्या १.४ षटकांपर्यंत रिव्ह्यूचा पर्याय मिळाला नाही. चेन्नईने पहिल्या १० चेंडूत तीन विकेट गमावल्या. यानंतरही विकेट जाण्याची प्रक्रिया थांबली नाही आणि संघ ९७ धावांवर सर्वबाद झाला.

महत्वाच्या बातम्या-
मुकेश अंबानीने लाईट घालवून मुंबईला जिंकवलं; चेन्नईचे फॅन्स तापले, भन्नाट मीम्स व्हायरल
चेन्नईचा ९७ धावांत उडवला खुर्दा; धडाकेबाज विजय मिळवत मुंबई इंडीयन्सने बदला घेतला
मोठा धक्का! मुंबईने ९७ धावांवरच चेन्नईला ऑलआऊट करत जिंकला सामना, चेन्नईचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं
रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये वाद, संघ व्यवस्थापन जडेजाला बाहेरचा रस्ता दाखवणार?

 

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now