Share

रमेश देव यांच्या निधनानंतर लेक झाला भावूक, म्हणाला, ‘आमच्या आयुष्यातील सगळ्यात दु:खद दिवस’

रमेश देव

मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या दिलखुलास अभिनयाने सर्वांचे मन जिंकणारे, जेष्ठ अभिनेता रमेश देव यांचे निधन झाले आहे. जेष्ठ अभिनेता रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने ९३ व्या वर्षी निधन झाले.(After the death of Ramesh Dev, Lake became emotional, saying, ‘The saddest day of our lives’)

रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ मध्ये कोल्हापूरमध्ये झाला. देव यांचे आजोबा अभियंता होते. त्यांचे राजस्थानमधील जोधपुर पॅलेसच्या उभारणीत मोठं योगदान दिल्याने कोल्हापूर शहराच्या उभारणीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी देव यांच्या आजोबांना निमंत्रित केलं. त्यामुळे देव कुटुंब कोल्हापुरात स्थायिक झाले.

रमेश देव यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी जेष्ठ अभिनेत्री सीमा देव, मुलगा अजिंक्य देव आणि अभिनय देव, सुना, नातवंडे असा त्यांचे कुटुंब आहे. रमेश देव यांचे कुटुंब एवढेच होते. रमेश देव अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्वाचे होते.
‘कुटुंबियांसाठी आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातील हा दुःखद दिवस आहे. काल बुधवारी हॉस्पिटलमध्ये आम्ही एकत्र होतो. नॉर्मल रूममध्ये शिफ्ट ही करणार होतो ते सुद्धा अगदी सकारात्मक होते मी छान आहे. म्हणाले सगळं नॉर्मल होतं. मात्र नियतीचे खेळ आहेत, 9 वाजता त्यांना ह्रदयविकाराचा धक्का आला. त्यांना जगण्यावर प्रचंड प्रेम होतं. त्यांना खूप जगायचं होतं. अनेकदा त्यांनी याआधी यमाला मात दिली आहे. पूर्णपणे ते त्यांच्या मूल्यांवर आयुष्य जगलं.’ असं अजिंक्य देव म्हणतात.

अजिंक्य देव पुढे हेही म्हणाले की, ‘त्यांचं आयुष्य सेलिब्रेट करूया कारण ते पूर्णपणे जगले. त्यांचा पुढचा प्रवास सुखद व्हावा म्हणून प्रार्थना करा. त्यांना आणि आईला तुम्ही खूप प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचे आभार.’

रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. १९५१ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. १९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

रमेश देव यांनी त्यांच्या करियरची सुरवात १९५० मध्ये केली होती. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी २५० हिंदी सिनेमे, १९० मराठी सिनेमे आणि ३० मराठी नाटकात काम केले आहे. ‘आनंद’, ‘घराना’, ‘सोने पे सुहागा’, ‘गोरा’, ‘मिस्टर इंडिया’, ‘कुदरत का कानून’, ‘दिलजला’, ‘शेर शिवाजी’, ‘प्यार किया है प्यार करेंगे’ रमेश देव यांच्या या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.

महत्वाच्या बातम्या
PHOTO: नवाजु्द्दीन सिद्दीकीच्या घरी अनोख्या अंदाजात पोहोचली कंगना, तिच्या ड्रेसची सगळीकडे चर्चा
नाद खुळा! ‘त्या’ शेतकऱ्याने शेवटी महिंद्रा बोलेरो घेतलीच आणि तेही कर्जावर; म्हणाला…

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now