7 जुलै 2021 रोजी महान भारतीय अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे जाणे देशाचे कधीही न भरणारे नुकसान आहे. त्याची उणीव आजही चाहत्यांना जाणवत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीने एक महान कलाकार गमावला पण त्यांच्या जाण्याने सायरा बानू (Saira Banu) यांच जणू जीवनच संपल आहे.(After the death of Dilip Kumar, Saira Bano lost contact with everyone)
सायरा बानो यांचे संपूर्ण आयुष्य दिलीप साहेबांच्या अवतीभोवती फिरत होते. त्यांच्यासोबत राहणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांची काळजी घेणं… यातच सायरा बानोचा अख्खा दिवस जात असे. त्यांनी दिलीप कुमार यांना क्षणभरही एकटे सोडले नाही. पण आता त्यांच्या जाण्यानंतर त्या एकट्या पडल्या आहे आणि निराशही आहे. बातमी अशी आहे की त्यांनी सगळ्यांना भेटणे बंद केले आहे आणि त्या कोणाच्या फोनलाही उत्तर देत नाहीये.
अलीकडेच, दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री मुमताजने सांगितले की, तिने सायरा बानोला अनेक कॉल केले पण त्यांनी उत्तर दिले नाही. यानंतर ती त्यांना त्यांच्या बंगल्यावर भेटायलाही गेली पण तिथेही त्या तिला भेटू शकल्या नाही. अशा परिस्थितीत दिलीप साहेब यांच्या निधनानंतर सायरा बानो एकांतात जणू हरवूनच गेल्या आहेत.
केवळ मुमताजच नाही तर अभिनेते धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांनीही सायरा बानोशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत इंडस्ट्रीतील लोक आता सायरा बानोबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, आपण एक महान अभिनेता गमावला आहे. त्यांनी आणि त्यांची पत्नी पूनम यांनी अलीकडेच सायरा बानोच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मेसेज केला होता, पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. ते म्हणाले, मला फक्त त्यांना हे कळवायचे आहे की माझी पत्नी आणि मी त्याच्या पाठीशी उभे राहू.
सायरा बानो यांचे दिलीप कुमारवर खूप प्रेम होते. दिलीप कुमार यांना मिळवण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. सायरा पहिल्याच नजरेत दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडली आणि तिने वयाच्या 22 व्या वर्षी 44 वर्षीय दिलीप कुमार यांच्याशी लग्न केले. लोकांनी त्यांच्या नात्यावरही प्रश्न उपस्थित केले, पण दिलीपसाहेबांवरील त्यांचे प्रेम कधीच कमी झाले नाही.
सायरा बानो आणि दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचा विवाह 11 ऑक्टोबर 1966 रोजी झाला होता. दोघांच्या वयात खूप अंतर होतं. लग्नानंतर दोघे कधीही वेगळे झाले नाहीत आणि बराच काळ एकत्र घालवला. दोघे 55 वर्षे एकत्र राहिले आणि गेल्या वर्षी दिलीप कुमार यांचे निधन झाले.
महत्वाच्या बातम्या-
सायरा बानोसाठी तब्बल एवढ्या कोटींची संपत्ती सोडून गेले होते दिलीप कुमार, पालीमध्ये आहे शानदार बंगला
.त्यामुळे दिलीप कुमार यांनी तोडले होते मधुबालासोबत सगळे संबंध, मग रागाच्या भरात मधुबालाने केले असे काही की..
जेव्हा कोर्टात स्वत: दिलीप कुमार यांनी लढली होती लता मंगेशकर यांची केस; म्हणाले,ताई चिंता नको करू
कादर खान यांनी दिलेल्या या अटी पुर्ण करताना ढसाढसा रडले होते दिलीप कुमार, वाचा भन्नाट किस्सा