एबीजी शिपयार्ड बँकिंग घोटाळ्याबाबत केंद्र सरकारने भूमिका मांडली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एबीजी घोटाळ्याबाबत तत्कालीन काँग्रेस सरकारकडे बोट दाखवले आहे. काँग्रेस सरकारच्या कालखंडात एबीजीची सर्व बँक खाती एनपीए मध्ये वर्ग करण्यात आल्याचा दावा मंत्री सीतारमण यांनी केला आहे.(After the bank scam was exposed, Nirmala Sitharaman)
बँकांनी वेळेपूर्वीच घोटाळा उघड केल्यानं एबीजीवर कारवाई सुरू करण्यात आल्याचं सीतारमण यांनी सांगितले आहे. अन्यथा अशा प्रकारचे घोटाळे समोर येण्यासाठी ५२ ते ५६ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाते, असे सांगत सीतारमण यांनी गुन्हा नोंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या बँकांचं कौतुक केलं आहे.
रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळातील संचालकांची बैठक सोमवारी पार पडली. बैठकीनंतर पहिल्यांदाच सीतारमण यांनी बँकिंग घोटाळ्याबाबत अधिकृत भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे. एबीजी शिपयार्ड घोटाळ्यावरुन सध्या आरोप होत आहेत. काँग्रेसने गुन्हा नोंदवण्यासाठी उशीर झाल्याचं म्हटलं आहे. एबीजीनं कर्ज घेतलेल्या बँकांच्या यादीत स्टेट बँकेचा सर्वात वरचा क्रमांक लागतो.
दरम्यान, स्टेट बँकेवर गुन्हा दाखल करण्यास विलंब करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. यावर स्पष्टीकरण देताना स्टेट बँकेने विलंबाचा दावा फेटाळला आहे. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर सीबीआयकडे तक्रार दाखल केल्याचं स्टेट बँकेच्या सूत्रांनी सांगितले आहे. देशातील आजवरचा सर्वात मोठा बँकिंग घोटाळा समोर आल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
एबीजी शिपयार्ड आणि त्यांच्या संचालकांच्या विरोधात तब्बल २८ बँकांसह २२,८४२ कोटींच्या आर्थिक फेरफार प्रकरणी प्राथमिक गुन्ह्याची नोंद केली आहे. एबीजी शिपयार्ड जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती क्षेत्रातील आघाडीची कंपनी मानली जात आहे. कंपनीचे शिपयार्ड गुजरात राज्यातील दहेज आणि सूरत राज्यांत आहे.
एबीजी शिपयार्ड आणि त्यांचे संचालक ऋषी अग्रवाल, संथनम मुथुस्वामी आणि अश्विनी अग्रवाल यांच्याविरोधात २२ हजार कोटी रुपयांच्या फेरफार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने स्टेट बँकेकडून २९२५ कोटी, आयसीआयसी कडून ७०८९ कोटी, आयडीबीआय कडून ३६३४ कोटी, बँक ऑफ बडौदा कडून १६१४ कोटी, पीएनबी कडून १२४४ कोटी आणि आयओबी कडून १२२८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.
महत्वाच्या बातम्या
राखी सावंतला हात लावण्याचा प्रयत्न करत होता चाहता, कॅमेऱ्यात कैद झाली पुर्ण घटना, पहा व्हिडीओ
हिजाब वाद: ठार मारण्याची धमकी देणाऱ्यांना १२वी टॉपर अरुसा परवेझने दिले सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाली..