Share

इतक्या वर्षांनंतर मुमताजने धर्मेंद्रला दिलं अनोखं सरप्राईज, धर्मेंद्रही झाले खुश, पत्नीने केलं जंगी स्वागत

अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) आश्चर्यचकित झाले जेव्हा एक जुनी अभिनेत्री आणि त्यांची सर्वोत्कृष्ट सहकलाकारांपैकी एक मुमताज (Mumtaz) अचानक त्यांना भेटायला घरी पोहोचले. मुमताज एके दिवशी आपल्या बहिणीसह त्यांना सरप्राईज देण्यासाठी धर्मेंद्रच्या घरी पोहोचली. धर्मेंद्र यांना त्या दोघींना घरी आलेलं पाहून खूप आनंद झाला होता.(After so many years, Mumtaz gave Dharmendra a unique surprise)

धर्मेंद्र आणि त्यांची पत्नी प्रकाश कौर यांनी भेटण्यासाठी आलेल्या मुमताजचे जोरदार स्वागत केले. मुमताज धर्मेंद्र यांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. प्रकाश कौर यांनी मुमताज आणि तिच्या बहिणीच्या स्वागतात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी तासनतास गप्पा मारल्या आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.

गप्पा-गोष्टींचा प्रवास असाच चालला आणि वेळ कधी निघून गेला ते कळलेच नाही. मुमताज यांनी अभिनेता जॅकी श्रॉफ आणि गायक आशा भोसले यांचीही भेट घेतली होती. धर्मेंद्र आणि मुमताजची जोडी 60 आणि 70 च्या दशकातील हिट जोडींपैकी एक होती. दोघांनी ‘झील के उस पार’, ‘आदमी और इंसान’, ‘लोफर, ‘काजल’, ‘मेरे हमदम मेरे दोस्त’ आणि ‘चंदन का पालना’ यांसह अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

mumtaz meets dharmendra3

मुमताजने 1958 मध्ये बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एक्स्ट्रा कलाकार म्हणूनही काम केले. मात्र, ती मोठी झाल्यावर तिला पहिला ब्रेक ‘गहरा दाग’ चित्रपटातून मिळाला. ज्यामध्ये तिने नायकाच्या बहिणीची भूमिका साकारली होती. यानंतर मुमताजने डझनभर चित्रपट केले, त्यापैकी ‘टॉय’साठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.

मुमताजने 1974 मध्ये बिझनेसमन मयूर माधवानीसोबत लग्न केले आणि त्यानंतर 1990 मध्ये फिल्म इंडस्ट्रीला अलविदा केले. त्यानंतर मुमताजने कोणतेही काम घेतले नाही. त्याचवेळी धर्मेंद्र सध्या करण जोहरच्या ‘रॉकी आणि राणीची लव्हस्टोरी’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. त्यांना या चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

काही दिवसांपूर्वी मुमताज यांचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावरून पसरली होती आणि लोकांनी ते स्वीकारले होते. हे सत्य तेव्हा समोर आले जेव्हा मुमताजच्या मुलीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून मुमताजचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात मुमताज म्हणत होती, ‘मित्रांनो, मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते. बघा, मी मेलेली नाही, मी जिवंत आहे. मी तितकी म्हातारी नाही जितकी लोक म्हणतात. तुमच्या प्रार्थनांमुळे मी अजूनही छान दिसते.’ सध्या मुमताज पूर्णपणे निरोगी आहे आणि ती मुंबईपासून दूर लंडनमध्ये राहते.

महत्वाच्या बातम्या-
गरीब महिला निघाली तब्बल १०० कोटींच्या जमिनीची मालकीण, इन्कम टॅक्सचे अधिकारीही हैराण
रनवे ३४ ट्रेलर: जेव्हा पायलटने सिगरेट ओढल्यामुळे झाला होता ५१ लोकांचा मृत्यु, वाचा खरी कहाणी
..त्यामुळे दोन वर्षांपासून मी अंकिता लोखंडेच्या घरी घरजावई बनून राहतोय, विक्की जैनचा मोठा खुलासा
खेळायच्या वयात मुंबईच्या मुलाने उभी केली करोडोंची कंपनी, २०० जणांना दिल्या नोकऱ्या, वाचा यशोगाथा 

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now