Share

शिवसेनेनंतर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता, ११ पैकी १० आमदार जाणार भाजपसोबत

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि अपक्ष अशा ५० आमदारांनी बंडखोरी केल्याने मोठा भूकंप आला. महाविकास आघाडी सरकार कोसळलं, आणि शिंदे गटाने भाजपसोबत येऊन सत्ता स्थापन केली. आता महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात देखील राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माहितीनुसार, गोव्यात लवकरच राजकीय भूकंप होणार आहे. कारण, काँग्रेसचे ११ पैकी १० आमदार भाजपात विधिमंडळ गटात विलीनीकरण करण्याच्या तयारीत असल्याचं समोर येत आहे. भाजप श्रेष्ठींकडूनही यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

आज गोव्यातील राजकीय हालचाली गतीमान होणार असल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून आज सायंकाळ पर्यंत दहा आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी ११जुलै पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडून देणाऱ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी या राजकीय हालचालींचा सुगावा लागल्यानंतर तातडीने याची दखल घेतली.

माहितीनुसार, विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांच्यासह अन्य ९ काँग्रेस आमदार असे एकूण दहा जणांचा गट भाजपात विलीन होणार अशी ठाम माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या आमदारांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीवेळी महाविकास आघाडी शंभरीही गाठू शकलेले नव्हती. कारण, या दिवशी काँग्रेसचे तब्बल ११ आमदार गैरहजर होते. याच दिवशी पक्षशिस्त मोडल्याची दखल हायकमांकडून घेण्यात आली, आणि काँग्रेसचे ११आमदार संकटात आले.

राजकारण

Join WhatsApp

Join Now