“संजय राऊत यांच्या नंतर आता शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता देखील जाणार तुरुंगात”

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुंबईतील घरावर काल सकाळी ईडीने छापा टाकला. संजय राऊत यांची सकाळपासून चौकशी सुरू होती. त्यानंतर ईडीने मध्यरात्रीनंतर संजय राऊतांना अटक केली. यावर आता भाजप आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर रवी राणा यांनी राऊतांवर गंभीर आरोप केले. रवी राणा म्हणाले, संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बिल्डरांकडून आणि व्यवसायिकांकडून अवैध पैसा गोळा केला. मोठा भ्रष्टाचार केला.

तसेच म्हणाले, महाविकास आघाडी सरकारची स्थापना करण्यासाठी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून देखील मोठी रक्कम घेतली होती. असा आरोप रवी राणा यांनी केला आहे. या सगळ्या पैशांची चौकशी व्हावी अशी मागणी रवी राणा यांनी केली.

संजय राऊत यांना खूप आधी अटक व्हायला पाहिजे होती. ईडीकडे संजय राऊतांविरोधात मोठ्या प्रमाणात पुरावे आहेत. संजय राऊत दोन ते तीन वर्षे जेलमध्ये राहतील. जेलमध्ये गेल्यावरच संजय राऊत यांचं डोकं ठिकाणावर येईल असे रवी राणा म्हणाले.

संजय राऊत यांच्याप्रमाणेच अनिल परब यांनीही अनेक घोटाळे, भ्रष्टाचार केले आहेत. त्यामुळे राऊतांपाठोपाठ परब यांच्यावरही अटकेची टांगती तलवार असल्याचं भाकीत यावेळी रवी राणा यांनी केलं. त्यामुळे रवी राणा यांचं भाकीत खरं होणार का हे पहावं लागेल.

रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पथकाने संजय राऊतांच्या विक्रोळी येथील निवासस्थानी धाड टाकली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी ईडीने राऊतांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले. तिथे त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. यानंतर साडेबाराच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केल्याची घोषणा केली.