Rohit : दक्षिण आफ्रिकेच्या संघाने रविवारी टी -20 विश्वचषकात भारताला 5 विकेटने पराभूत केले. पर्थच्या वेगवान आणि बाउन्सी खेळपट्टीवर टीम इंडियाची दुखरी बाजू उघडकीस आली. रोहित शर्माचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरला.टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर अक्षरश गुडघे टेकले. सूर्यकुमार वगळता, इतर कोणताही भारतीय फलंदाज वेगवान आणि बाउन्सी खेळपट्टीवर टिकू शकला नाही.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेच्या हातून टीम इंडियाच्या पराभवानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पर्थ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी -२० विश्वचषक सामना गमावल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, ‘आम्हाला माहीत होतं की खेळपट्टी गोलंदाजांना साथ देईल.
आम्हाला माहित होते की खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना खूप मदत करेल, म्हणून लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे होणार नाही. आम्ही बॅटींगमध्ये थोडेसे कमी पडलो. आम्ही चांगली लढत दिली पण आज दक्षिण आफ्रिका अधिक चांगली खेळली.
रोहित शर्मा म्हणाला, ‘ईडन मार्कराम आणि डेव्हिड मिलर यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी सामना जिंकवणारी भागीदारी केली. आम्ही आमच्या चुकांमधून दक्षिण आफ्रिकेला खराब स्थितीतून सामन्यात परत येण्याच्या बर्याच संधी बहाल केल्या. आमची फिल्डींग खराब झाली.
मागच्या दोन सामन्यांमध्ये आमची फील्डिंग चांगली होती, परंतु आज आम्ही फील्डिंग चांगली करू शकलो नाही. आम्ही काही अतिरीक्त धावाही दिल्या. तसेच आम्ही अनेक धावबादच्या संधी सोडल्या. या क्षणी आम्हाला यातून शिकण्याची आवश्यकता आहे.
डेव्हिड मिलर (59 नाबाद) आणि एडेन मार्करामच्या चमकदार अर्धशतकांमुळे दक्षिण आफ्रिकेने भारताला 5 विकेट्सने पराभूत केले. नऊ विकेट्स गमावून भारताने 133 धावा केल्या होत्या.प्रत्यूत्तरात दक्षिण आफ्रिकेने 19 .4 षटकांत 134 करत विजय मिळवला. भारतासाठी अरशदीप सिंग यांनी दोन विकेट घेतल्या. त्याच वेळी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या
gujarat : गुजरातमध्ये मृत्यूचे तांडव! नदीत पूल कोसळून १५० लोकं बुडाले, आतापर्यंत ३५ मृतदेह बाहेर काढले
ह्रदयाची धडधड वाढवणाऱ्या सामन्यात भारत अखेरच्या षटकात पराभूत, पाकीस्तान विश्वचषकाच्या बाहेर
Govardhan: गाईच्या शेनापासून बनवला ३५ फूटी श्रीकृष्ण; पाहण्यासाठी उसळली तुफान गर्दी