रायगडनगर जवळील महामार्गालगतची ही घटना आहे. डॉ. सुवर्णा संदीप वाजे या २५ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या पतीने याबाबत मध्यरात्री अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी या विषयी तक्रारही केली.(After removing his wife’s fork, he went to the police station)
कौटुंबिक कलहातून वारंवार उडणारे खटके व वादविवादामुळे मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे, यांचा त्यांच्या पतीनेच पूर्वनियोजित कट रचून थंड डोक्याने काटा काढला. वाजे ‘मर्डर मिस्ट्र’ चा पडदा फाश करण्यात पोलीसांना यश मिळाले. गुरुवारी पोलीसांनी संशयित वाजे यास बेड्या ठोकल्या.
सिडको येथील मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत, डॉ. सुवर्णा संदीप वाजे वय वर्ष ३८ दिनांक २५ जानेवारीच्या रात्रीपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या पतीने याबाबत अंबड पोलिस ठाण्यात मध्यरात्री धाव घेत, तक्रार दाखल केली.
मात्र त्यानंतर वाजे यांची गाडी महामार्गालगत जळलेल्या अवस्थेत सापडली होती. तसेच त्या कारमध्ये काही मानवी हाडेदेखील सापडल्यामुळे पोलीसांचा संशय जास्त वाढला. जळलेली हाडे नेमकी कोणाची याचा उलगडा पोलीसांनाही होत नव्हता.
त्यानंतर डिएनए रिपोर्टमधून समजले की, ही हाडे वाजे यांचीच आहेत. त्यानंतर पोलीसांनी त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. त्यानंतर सर्व सबूतांवरून पोलीसांनी संशयित पती संदीप यांना अखेर गुरुवारी बेड्या ठोकल्या. संदीप यांना शुक्रवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.
संदीप वाजे यांच्यासह या कटात त्यांचे साथीदारही सामील होते. वाजे यांच्या आणखी पाच साथीदारांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले की, उर्वरित साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
रहें ना रहें हम, महका करेंगे: अनंतात विलीन झाल्या लता मंगेशकर, भावाने भरलेल्या डोळ्यांनी दिला मुखाग्नी
VIDEO: जेलची हवा खाल्ली तरी थेरगाव क्वीनचा माज उतरेना, आता थेट ‘तो’ व्हिडीओ इंस्टावर केला पोस्ट