परदेशातील एखादया जोडप्याने लग्न झाल्यावर मुलाला जन्म न देण्याचा निर्णय घेणं हे विशेष नाही. पण भारतात लग्न झाल्यानंतर घरात पाळणा हाललाच पाहिजे असा अनेकांचा आग्रह असतो. भारतात जर लग्न झालेल्या एखाद्या महिलेने मुलाला जन्म न देण्याचा निर्णय घेतला तर तिच्यावर प्रश्नांचा भडीमार होतो.
असाच काहीसा प्रकार सध्या दाक्षिणात्य अभिनेता रामचरणच्या पत्नीशी संबंधित आहे. रामचरणची पत्नी उपासना हिने आई न होण्याचा निर्णय घेतला आहे. रामचरण आणि उपासना यांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. उपासानाने घेतलेल्या या निर्णयामुळे तिला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे.
नुकत्याच १७ व्या एटीए अधिवेशन आणि युवा परिषदेत अध्यात्मिक गुरू सद्गुगुरूंशी संवाद साधताना उपासनाने त्यांना देखील याबद्दल प्रश्न विचारला. आपण आई न घेण्याचा निर्णय योग्य की अयोग्य याबद्दल तिने त्यांना विचारणा केली. यावर सद्गुगुरूंनी जे उत्तर दिलं ते ऐकून तुमचं देखील नक्कीच समाधान होईल.
सद्गुगुरू म्हणाले, आई न होण्याच्या निर्णयावर तुम्ही कायम असाल, तर मी तुमचा पुरस्कार देऊन सत्कार करेन. मी आधीच त्या सर्व तरुणींसाठी हा पुरस्कार जाहीर केला आहे, ज्या निरोगी आहेत आणि आई बनू शकतात परंतु त्यांनी आई न होण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच म्हणाले, ही सर्वात मोठी सेवा आहे जी तुम्ही सध्या करू शकता. मानव ही काही लुप्त होणारी किंवा धोक्यात असलेली प्रजाती नाही. उलट आपण असंख्य आहोत. येत्या ३०-३५ वर्षांत आपण १० अब्जांच्या दिशेने वाटचाल करत आहोत, असे सद्गुगुरू म्हणाले.
पुढे म्हणाले, मानवाला कार्बन फूटप्रिंटची चिंता आहे पण जर मानवी पावलांचे ठसे कमी झाले तर ग्लोबल वॉर्मिंगचीही काळजी करण्याची गरज नाही. म्हणून ज्या स्त्रियांनी असा निर्णय घेतला आहे, तो चांगला आहे असे सद्गुगुरू म्हणाले. त्यांच्या या उत्तराने उपासना देखील खुश झाली.